पालघर - पालघर जिल्ह्यातील सफाळेचे मंडळ अधिकारी सुरेंद्र संखे आणि तलाठी सोपान बब्रुवान पवार या दोघांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा सातबारा उतारा व फेरफार तयार करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. फिर्यादी गोंड यांनी या प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आफळेसह त्यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना १० हजारांची लाच स्वीकारताना अटक केली.
सातबारा उतारा तयार करण्यासाठी लाच मागणारे अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 17:56 IST