एटीएम सेंटरमध्येच अधिकाऱ्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:42 AM2020-01-21T03:42:18+5:302020-01-21T03:42:50+5:30

एअर इंडीयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाºयाची एटीएम सेंटरमध्येच फसवणूक झाल्याची घटना माहिममध्ये उघडकीस आली आहे.

Officer fraud at ATM center | एटीएम सेंटरमध्येच अधिकाऱ्याची फसवणूक

एटीएम सेंटरमध्येच अधिकाऱ्याची फसवणूक

Next

मुंबई : एअर इंडीयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाºयाची एटीएम सेंटरमध्येच फसवणूक झाल्याची घटना माहिममध्ये उघडकीस आली आहे. यात ठगाने त्यांच्या खात्यातील ९३ हजार रुपयांवर हात साफ केला आहे. या प्रकरणी माहिम पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

माहिमच्या मच्छीमार वसाहतीत राहणारे अनिल जाधव यांची यात फसवणूक झाली आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जानेवारी रोजी ते जवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. याच दरम्यान त्यांनी २० हजार रुपये काढले आणि ते पैसे मोजत उभे असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या ठगाने व्यवहार पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी पुन्हा एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून तपासणी केली.

त्याच दरम्यान हातचलाखीने ठगाने त्यांच्या एटीएम कार्ड बदलले. १६ ते १८ जानेवारी दरम्यान केलेल्या ६ व्यवहारांत त्यांच्या खात्यातून तब्बल ९३ हजार २७८ रुपये काढले. याबाबतचा संदेश मोबाइलवर धडकताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी रविवारी माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून माहिम पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Officer fraud at ATM center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम