शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी, पोलिसांच्या छळामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 05:26 IST

मृत्यूपूर्वी सचिन साबळे मुंबईला (गोरेगाव पूर्व) बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी नीता हीसुद्धा याच विभागात कार्यरत असल्याने सचिनसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. नीताचा नवरा एसटीत ड्रायव्हर होता.

नागपूर : प्रेयसी आणि पोलिसांनी संगनमत करून लाखोंची खंडणी उकळल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. मृत्युपूर्वी त्याने ब्लॅकमेलर प्रेयसी आणि खंडणीबाज पोलिसांच्या पापाचा पाढा लिहून ठेवल्याने ठाणे जिल्हा पोलिसांनी नागपुरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एका पीएसआयला अटक केली आहे.  (officer commits suicide due to Beloved and police harassment)सचिन चोखोबा साबळे (३८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते मूळचे पुण्याचे होते. आरोपी महिलेचे (प्रेयसी) नाव नीता मानकर-खेडकर आहे. पोलिसांनी नीता, तिची मुलगी, तिचा भाऊ दादा मानकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि मेश्राम नामक अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी केले असून, पीएसआय चव्हाणला अटकही केली.मृत्यूपूर्वी सचिन साबळे मुंबईला (गोरेगाव पूर्व) बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी नीता हीसुद्धा याच विभागात कार्यरत असल्याने सचिनसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. नीताचा नवरा एसटीत ड्रायव्हर होता. त्याला पत्नीच्या संबंधाची माहिती झाल्याने त्याने डिसेंबर २०२० मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्याचा तपास पीएसआय चव्हाणकडे होता. त्याने नीताशी संगनमत करून सचिन साबळेंना पद्धतशीर ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुमच्या अनैतिक संबंधामुळे नीताच्या पतीने आत्महत्या केली. त्यामुळे तुम्हाला आरोपी बनविण्यात येईल. ते टाळायचे असेल तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले.साबळेंनी मुंबईहून येऊन मासुरकर नामक व्यक्तीच्या हाताने तत्कालीन ठाणेदार दुर्गे यांना साडेचार लाख रुपये दिले. काही दिवसांनी चव्हाणने साबळेंना फोन करून विविध कारणे सांगत आधी दोन लाख व नंतर तीन लाख रुपये मागितले. चव्हाणच्या नातेवाइकाने मुंबईत जाऊन साबळेंकडून दोन लाख वसूल केले. पोलीस खंडणी वसूल करीत असतानाच नीता हिने साबळेंमागे लग्नासाठी तगादा लावला. तिची मुलगी आणि नीताचा भाऊदेखील साबळेंना धमकावू लागले. सततचे फोन, व्हॉट्सॲप चॅटिंग करून या मंडळींनी कोंडी केल्याने अखेर १८ फेब्रुवारीला साबळेंनी यांनी आत्महत्या केली.

चव्हाण निलंबित, दुर्गे, मेश्रामवरही कारवाई -चव्हाणला निलंबित केले असून, दुर्गेविरुद्धही कारवाई होणार आहे. मेश्राम या प्रकरणात लाभार्थी आहे की त्याचे नाव वापरून चव्हाणने पुन्हा तीन लाख हडपण्याचा प्रयत्न केला, ते स्पष्ट न झाल्यामुळे त्याच्यावरच्या कारवाईसाठी विचार सुरू असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणे