शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने डोकंच फिरलं; संतप्त तरुणाने बंदुकीच्या धाकावर कुटुंबाला ओलीस ठेवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:07 IST

Crime News : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका तरुणाचं डोकंच फिरलं आहे. संतप्त झालेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक चित्र-विचित्र घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका तरुणाचं डोकंच फिरलं आहे. संतप्त झालेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. रागाच्या भरात तरुणाने मुलीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

ओडिशातील बोलंगीर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्याच एका नातेवाईकाने मुलीसाठी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणाने बंदुकीच्या धाकावर मुलीच्या कुटुंबाला ओलीस ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम पांडा असं या आरोपीचं नाव आहे. तो अचानक मुलीच्या घरात शिरला आणि त्यानंतर त्याने बंदुकीच्या धाकावर संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ओलीस ठेवलेल्या या कुटुंबाची सुरक्षितपणे सुटका केली आणि आरोपीला अटक केली आहे. 

तरुणी एका रुग्णालयात काम करत असून आरोपी तिच्या प्रेमात पडला होता. त्यामुळेच या तरुणाने आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलीच्या कुटुंबीयांकडे दिला होता मात्र, तो मुलीच्या नातेवाईकांनी फेटाळला आणि लग्नास नकार दिला. यानंतर तरुण चांगलाचं संतापला आणि त्याने टोकाचा निर्णय घेतला. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आमच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली होती आणि मुलीला आणण्यास सांगितले. ती आता घरी नाही आहे हे सांगितले त्यानंतरही तो ऐकायला तयार नव्हता. पाच तासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तुफान राडा! जेवणात माशाचा आवडता तुकडा न वाढल्याने लग्नमंडपात हाणामारी; 11 जण जखमी

एका लग्नात माशाचा आवडता तुकडा न मिळाल्याने जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात माशाचे डोके न मिळाल्याने खूप वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि यामध्ये तब्बल 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. बिहारच्या (Bihar) गोपालगंजमधील भोरे क्षेत्रातील भटवलिया गावातील आहे. लग्न मंडपात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भटवलिया गावात एका लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान जेवणात आवडता पिस म्हणजेच माशाचे डोके न मिळाल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे. लग्नसोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये माशाच्य़ा आवडत्या पिसवरून वाद झाला होता. हा वाद एका माशाचा पिससाठी पुढे विकोपाला गेला. थेट हाणामारी सुरू झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे 11 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्...

 राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळत आहे. महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला (Head Constable) मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस कॉन्स्टेबलने आमदाराच्या (MLA) भाच्याची बाईक थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला आमदार रमिला खरिया यांना आपल्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा राग आला आणि त्यांनी कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसArrestअटक