शासकीय कामात अडथळा, आरोपीस सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:15 PM2022-02-18T22:15:25+5:302022-02-18T22:15:42+5:30

Session Court decision : तपासिक अधिकारी बी.बी. तोंडारे यांनी आरोपीविरुध्द उदगीर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Obstruction of government work, rigorous imprisonment of the accused; Sessions Court decision | शासकीय कामात अडथळा, आरोपीस सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा निकाल

शासकीय कामात अडथळा, आरोपीस सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा निकाल

Next

लातूर /उदगीर : देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकास मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपीस उदगीरच्या सत्र न्यायालयाने विविध कलमान्वये दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदपूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकास आरोपी गुंडेराव माधवराव कासले याने २१ ऑक्टोबर २०१६ रोजी शाळेत येऊन तू माझ्या लेकराला नीट शिकवत नाहीस, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच तोंडावर, गालावर मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद दाखल झाल्याने देवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४ व ५०६ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासिक अधिकारी बी.बी. तोंडारे यांनी आरोपीविरुध्द उदगीर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खुटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी.डी. सुभेदार यांच्यासमोर झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षी, पुरावे व कागदपत्रांअधारे न्यायालयाने आरोपीस कलम ३५३ भादविप्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व २ हजार ५०० रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद तर कलम ३३२ भादविप्रमाणे दोन वर्षे सश्रम कारावास व २ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावी, असा निकाल शुक्रवारी देण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक शासकीय अभियोक्ता एस.आय. बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांना एस.एम. गिरवलकर व जी.सी. सय्यद यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवीचे काम सय्यद शौकत उस्मान यांनी केले.

Web Title: Obstruction of government work, rigorous imprisonment of the accused; Sessions Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.