शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

रुग्णालयातील नोकरीच्या आमिषाने नर्सकडून साडेतीन लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 6:18 PM

रूग्णालयात नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाख ५० हजार रुपयांना एका नर्सने गंडा घातला आहे.

ठळक मुद्देलोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल सदर घटना ही ५ नोव्हेंबर ते  २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडलेली

लोणी काळभोर : रूग्णालयात नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाख ५० हजार रुपयांना एका नर्सने गंडा घातला आहे. या नर्स विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुक प्रकरणी कैलास दौलत सावंत ( वय ३२, रा. थेऊर, चव्हाणवस्ती, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे.  सिमा मुक्ताजी नितनौरे (रा. श्रीराम निवास, कोलवडी, ता. हवेली ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी नर्सचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही ५ नोव्हेंबर ते  २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडलेली आहे. कैलास सावंत यांच्या आई चतुराबाई आजारी असल्याने कोलवडी येथील साक्षी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी सिमा नितनौरे या नर्स म्हणून काम करतात. या दोघींची ओळख झाली होती. एके दिवशी चतुराबाई यांनी माझ्या मुलास नोकरी मिळत नाही असे सांगितले. यांवर सिमा हिने मी तुमच्या मुलाला रूग्णालयात नोकरीला लावते. त्यासाठी खर्च म्हणून साडेतीन लाख रुपये लागतील असे सांगितले. मुलाला नोकरी लागत आहे हे पाहून चतुराबाई यांनी ५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी ३ लाख ५० हजार रुपये दिले.      त्यानंतर चतुराबाई यांचा मुलगा कैलास याने आपल्या भावास काम लागावे म्हणून वारंवार पाठपुरावा केला. परंतु, नितनौरे यांनी दाद दिली नाही. नोकरीस लावत नाही म्हणून कैलास यांनी पैशांची मागणी केली. वारंवार पैश्यांची मागणी होत आहे हे पाहून सिमा नितनौरे हिने एक लाख व दुसरा अडीच लाखांचा असे दोन धनादेश दिले. व ते वटतील अशी हमी दिली. सावंत यांनी ते दोन्ही धनादेश बॅक आॅफ इंडिया थेऊर शाखेत वटवणेसाठी जमा केले असता नितनौरे यांचे खाते बंद केल्याच्या शे-यासह परत आले. त्यामुळे फिर्यादीने फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करत आहेत. 

 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिस