शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रवी पुजारीनंतर आता दाऊदची गॅंग तपास यंत्रणांच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:56 IST

गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळत नाही आहे. 

ठळक मुद्देअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात सक्रिय आहे. विविध देशात लपून असणाऱ्या आणि वेश बदलेल्या अंडरवर्ल्ड गुंडांच्या यादीत गुरू साटमचा देखील समावेश आहे.आता मुंबई पोलिसांच्या रडारवर प्रसाद पुजारी हा आहे.

मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे १ फेब्रुवारीला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याला भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात सक्रिय आहे. डी कंपनीसोबत इतरही अंडरवर्ल्ड डॉन वेगवेगळ्या विविध देशात वास्तव करत आहेत आणि तेथूनच मुंबईतला कारभार हाताळतात. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळत नाही आहे. 

विविध देशात लपून असणाऱ्या आणि वेश बदलेल्या अंडरवर्ल्ड गुंडांच्या यादीत गुरू साटमचा देखील समावेश आहे. गेल्याच महिन्यात पोलिसांनी त्याचा खास माणूस कृष्णकुमार नायरला अटक केली होती. गुरू साटम हा पूर्वी छोटा राजन टोळीसोबत कार्यरत होता. आता मुंबई पोलिसांच्या रडारवर प्रसाद पुजारी हा आहे. प्रसाद पुजारी हा परदेशात राहून आपला कारोभार चालवणारा आणि गुरू साटमहून अधिक सक्रिय असल्याची माहिती अंडरवर्ल्डविषयी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यापूर्वी प्रसाद पुजारी हा कुमार पिल्लेसाठी काम करत होता. अगोदर त्याने बंटी पांडे आणि रवी पुजारीसाठी काम केले होते. प्रसाद पुजारी हा विक्रोळीचा राहणार असून आता तो परदेशातून अंडरवर्ल्डचा कारोभार सांभाळतो. त्याचप्रमाणे त्याने स्वत:ची स्वतंत्र गॅंग तयार केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात असलेला विजय तांबट हा देखील पोलिसांच्या निशाण्यावर आहे. तांबटचे मूळ नाव विजय साळवी असे आहे. विशेष म्हणदे तांबट सिंगापूरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एजाज लाकडावाला हा देखील मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर आहे.याआधी डी-कंपनी आणि सुरेश पुजारी याच्या धमकीच्या फोनच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

सप्टेंबर २००० साली बँकॉक शूट आउटनंतर छोटा राजनला हॉस्पिटलमधून पळून जाण्यात भरत नेपाळी आणि संतोष शेट्टी यांनी मदत केली होती. नंतर नेपाळी आणि संतोष शेट्टी विभक्त झाले. विजय शेट्टी हा मुंबई पोलिसांना पाहिजे होता. विजय शेट्टी बँकॉकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुख्य म्हणजे विजय शेट्टीनेच भरत नेपाळीचा खून केला होता. इंडोनेशियात असताना अबू सावंत यांने छोटा राजनला सहकार्य केले. परदेशातील छोटा राजनच्या अनेक हॉटेल्सचा कारभार सावंतच चालवतो. 

टॅग्स :underworldगुन्हेगारी जगतDawood Ibrahimदाऊद इब्राहिमChhota Rajanछोटा राजनPoliceपोलिस