शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

सातारा, सांगली,कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:14 IST

आरोपीवर गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल..

ठळक मुद्देया प्रकरणात ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून चार पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे पोलिसांनी जप्त केली.सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय ३०, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) तसेच संतोष चंदू राठोड (वय २३, रा. तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध अग्निशस्त्रांचा व्यापार करणाऱ्या  मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा जुलै २०२० मध्ये पदार्फाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीच्या ४२ पिस्टल, गावठी कट्टे आणि ६४ काडतुसे जप्त केली होती. १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी नावे निष्पन्न झालेल्यांवरही कारवाईचे सत्र सुरू होते. दरम्यान, युनिट चारच्या पथकातील सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली. ते सर्व पोलीस कोरोनामुक्त झाल्यानंतर तपास पुन्हा सुरू झाला. 

नाव निष्पन्न झालेला आरोपी संतोष याच्यावर २०१८ मध्ये लोणावळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला. पोलिसांनी त्याला १० ऑगस्ट रोजी चिंचवड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ चव्हाण याचेही नाव निष्पन्न झाले. त्याला उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी तसेच शासकीय सेवकाला काम करण्यास अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला १७ ऑगस्ट रोजी कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

गुन्हे शाखा युनिट चारने आजवर या प्रकरणात ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखलआरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. तो सातारा परिसरात ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आणि ‘आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना चालवितो. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. निगडी परिसरात २०१६ मध्ये कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याचा खून झाला. या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी आहे. तसेच २०१८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथ हा मुख्य सूत्रधार होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकsandवाळू