शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाचे अपहरण करून हत्या, कन्हान नदीत फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 23:51 IST

यशोधरानगरातील गुंड राशिद खान याच्यासोबत काही दिवसांपासून त्याचे वैमनस्य टोकाला पोहचले होते. दोघांनी एकमेकांना ‘टपका दूंगा’ अशी धमकीही दिली होती

ठळक मुद्देइब्राहिमविरुद्ध तहसील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ३९९ (गैरकायद्याची मंडळी जमविणे)कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात तो फरार होता. मात्र, त्याचे वस्तीत नेहमीच जाणे-येणे होते, अशी चर्चा आहे.

नागपूर - मोमिनपुऱ्यातील कुख्यात गुंड छोटा इब्राहिम ऊर्फ छोटा नबी खान याची गुंडांच्या एका टोळीने अपहरण करून हत्या केली. त्याचा मृतदेह कन्हान नदीत फेकला. शनिवारी दुपारी हा प्रकार उघड झाल्यामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा इब्राहिम ऊर्फ नबी खान छोटा इब्राहिम म्हणून कुख्यात होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामाऱ्या, हल्ला, लुटमार, गैरकायद्याची मंडळी जमविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करून त्याला कारागृहातही डांबले होते. काही महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर परत गुन्हेगारीत सक्रिय झाला होता.

यशोधरानगरातील गुंड राशिद खान याच्यासोबत काही दिवसांपासून त्याचे वैमनस्य टोकाला पोहचले होते. दोघांनी एकमेकांना ‘टपका दूंगा’ अशी धमकीही दिली होती. या पार्श्वभूमीवर, यशोधरानगर आणि म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या तीन ते चार गुंडांनी गुरुवारी छोटा इब्राहिमला मोमिनपुऱ्यातून अपहरण करून यशोधरानगरातील विटाभट्टी चाैकात नेले. तेथे त्याच्यावर शस्त्राचे घाव घालून गंभीर जखमी करण्यात आले. नंतर एका वाहनात टाकून आरोपी त्याला कन्हानमध्ये घेऊन गेले आणि नदीत फेकून दिले.

बुधवारी रात्री शेवटचा दिसला

इब्राहिमविरुद्ध तहसील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ३९९ (गैरकायद्याची मंडळी जमविणे)कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात तो फरार होता. मात्र, त्याचे वस्तीत नेहमीच जाणे-येणे होते, अशी चर्चा आहे. बुधवारी रात्री त्याला वस्तीतील लोकांनी बघितले. नंतर तो गायब झाला. गुंडवृत्तीचा असल्याने त्याची कुणी दखल घेण्याचा प्रश्न नव्हता. शनिवारी दुपारी इब्राहिमचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी चाैकशीला गती दिली. नंतर राशिद, सोनू तसेच शम्मीची नावे पुढे आली. हत्या करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी इब्राहिमचे अपहरण केल्याचा घटनाक्रमही पोलिसांना कळला. रात्रीपर्यंत या प्रकरणाचे बरेचसे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते.

अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत

इब्राहिम अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. त्याने मोमिनपुऱ्यातील बकरामंडीत एकाची हत्या केली होती. उंचीने बुटका असल्याने त्याला छोटा इब्राहिम असे टोपणनाव पडले होते. तो अत्यंत आक्रमक होता. छोट्या छोट्या कारणावरून कुणावरही हल्ला करत होता. घातक शस्त्रही त्याच्याजवळ राहायचे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी त्याच्यासोबतच काही दिवसांपूर्वी उठतबसत होते. इब्राहिमच्या शीघ्रकोपी स्वभावामुळेच त्यांच्यासोबत त्याचे वैर निर्माण झाले होते, अशी माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस