डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी अधिष्ठात्यांना महिला आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:26 IST2019-05-27T19:24:04+5:302019-05-27T19:26:20+5:30
डॉ. पायल तडवी हिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी अधिष्ठात्यांना महिला आयोगाची नोटीस
मुंबई - रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची नोटीस बजावली आहे.
डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेत मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आहे. कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.
रॅगिंगच्या छळाला कंटाळून डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेतली असून मुंबईतील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली. कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे. pic.twitter.com/a7Lj3lYM5v
— Maharashtra Women Commission (@mscw_bandra) May 27, 2019