शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

लग्नात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे नाही केले पालन; वडगाव मावळमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:36 IST

गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून वडगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या विवाह समारंभाला मोठी गर्दी

ठळक मुद्दे लग्नसराईतील मावळात पहिला गुन्हा दाखल   

वडगाव मावळ : लग्नात सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं पालन न करणाऱ्या आणि ५० व्यक्तींची परवानगी असतानाही अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधूच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नसराईतील मावळात पहिला गुन्हा दाखल  शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीट येथे विवाह संपन्न झाला तेव्हा ही बाब समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस कर्मचारी एस. पी. घोटकर यांनी फिर्याद दिली आहे. राहूल रघूनाथ वरघडे, वय ३२, आकाश अनिल राउत, वय २६ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , वडगाव मावळ मधील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीटमध्ये विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते त्याला पोलिसांकडून ५० व्यक्तींसह रीतसर परवानगी देण्यात आली होती, यासाठी पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला होता. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थीचे पालन करून विवाह होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली. दरम्यान, विवाहाच्या स्थळावर नियमांची पायमल्ली करत ६० ते ७० जण लग्नास उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टसिंगच्या नियमाचंही पालन होताना पोलिसांना दिसलं नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वधूचे चुलते राहूल रघूनाथ वरघडे आणि हॉटेलचे मॅनेजर आकाश अनिल राउत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कोरोनाचे संकट व लॉकडाऊन मुळे गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात साध्या पध्दतीने विवाह पार पडले. परंतू, गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून वडगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या विवाह समारंभाला मोठी गर्दी झाली होती. ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आहेत तेथील लोक लग्नाला येत होती. आजपर्यत वडगाव शहरात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही. या गर्दीमुळे शहराला कोरोनाचा धोका होऊ शकतो. म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर वरिष्ठांचा आदेश आल्यावर पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPoliceपोलिसmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या