शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कार नाही, सायलेन्सर चोरून लाखो कमावतायत चोर, Maruti ची ‘ही’ कार ठरतेय टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:54 IST

देशातील विविध राज्यांमध्ये कार सायलेन्सरच्या चोरीच्या घटना पहायला मिळत आहेत. लखनौ, पुणे, मुंबई, अहमदाबाद अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा टोळ्या सक्रिय आहेत.

कार चोरीच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण सायलेन्सर चोरीच्या घटनेने तुम्हाला विचार करायला भाग पाडलंय का? अलीकडच्या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये सायलेन्सर चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसह वाहनधारकांपुढेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. म्हणजेच आता चोरांची नजर तुमच्या कारवर नाही, तर तुमच्या कारच्या सायलेन्सरवर आहे. यासाठी प्रत्येक कार नाही तर मारुती सुझुकीची एक विशिष्ट कार चोरांच्या टार्गेटवर आहे. लखनौ, पुणे, मुंबई, अहमदाबाद अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा टोळ्या सक्रिय आहेत, ज्या कारचे सायलेन्सर अवघ्या काही मिनिटांत गायब करतात.

मारुती सुझुकीची सर्वात परवडणारी व्हॅन मारुती ईको सध्या चोरांसाठी सॉफ्ट टार्गेट आहे. या प्रकरणी दक्षिण लखनौच्या अतिरिक्त एसपी मनीषा सिंह यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मोहनलालगंज पोलीस स्टेशन परिसरात अशाच एका टोळीला अटक करण्यात आली होती जी कार सायलेन्सर चोरीची घटना घडवत होती. हे चोरटे फार कमी वेळात गाडीचे सायलेन्सर काढून त्यात सापडणाऱ्या डस्टमधील महागडे घटक ब्लॅक मार्केटमध्ये विकायचे असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, पोलिसांचे लक्ष या घटनेकडे गेले कारण बहुतेक प्रकरणांमध्ये मारुती सुझुकी इको या कारचेच सायलेन्सर चोरीला गेल्याची नोंद होत होती. मनिषा सिंह सांगतात की, या प्रकरणात सहभागी असलेले आरोपी सायलेन्सरमधून निघणारे डस्ट मोठ्या प्रमाणात गोळा करून दिल्लीतील एका व्यावसायिकाला विकायचे.

यात काय आहे खास?चोरांना कारचे सायलेन्सर चोरण्यात अधिक रस असतो कारण ते उघडणे सोपे असते आणि त्यात काही महागड्या धातूंनी बनवलेले कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असते. BS6 वाहनांमधील वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीने कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जोडल्यानंतर चोरीच्या घटना वाढल्या. सायलेन्सरमध्ये सापडलेली मेटल डस्ट काळ्या बाजारात चढ्या भावाने विकली जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जुन्या वाहनांच्या तुलनेत नवीन वाहनांमध्ये डस्टचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच नव्या बीएस 6 कार्सना टार्गेट केले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काळ्या बाजारात मेटल डस्टची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,000 ते 4,000 रुपये आहे, तर एक्झॉस्ट गॅसमधील ऑक्सिजनची पातळी ओळखणारे सायलेन्सरमधील सेन्सर चोर सहजपणे 10 हजार ते 15 हजार रुपयांना विकू शकतात. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या चोरीमागे पैसा हे मुख्य कारण आहे. यात (PGM) ग्रुपच्या तीन मौल्यवान धातूंचा समावेश आहे जे रासायनिक अभिक्रियामध्ये मदत करतात. ज्यामुळे सायलेन्सरमधून बाहेर पडणारे प्रदूषक कमी हानिकारक बनतात. यामध्ये प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaruti Suzukiमारुती सुझुकी