रेमो डिसूजाविरोधात अजामीनपात्र वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 08:58 PM2019-10-25T20:58:22+5:302019-10-25T21:00:10+5:30

एका व्यक्तीने रेमोवर ५ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप लावला आहे.

Non-bailable warrant against Remo D'Souza | रेमो डिसूजाविरोधात अजामीनपात्र वॉरंट

रेमो डिसूजाविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Next
ठळक मुद्दे याप्रकरणी गाजियाबाद कोर्टाने न्यायालयात सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानंतर रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.२०१६ साली सत्येंद्र यांनी रेमोविरोधात खटला दाखल केला होता.

नवी दिल्ली - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजाविरोधात गाझियाबाद कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने रेमोवर ५ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी गाजियाबाद कोर्टाने न्यायालयात सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानंतर रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

२०१६ साली सत्येंद्र यांनी रेमोविरोधात खटला दाखल केला होता. याप्रकरणी गाझियाबाद जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु होती. सुनावणीच्या तारखांवेळी रेमो डिसूझा गैरहजर राहिल्याने कोर्टाने अखेर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. रेमोविरोधात गाझियाबादमधील सिहानी गेट ठाण्यात सत्येंद्र त्यागी यांनी गुन्हा दाखल केला. सत्येंद्र त्यागी यांनी, रेमोने अमर मस्ट डाय नावाचा चित्रपट बनवण्यासाठी २०१६ मध्ये ५ कोटी रुपये घेतले होते. यावेळी रेमोने  ५ कोटींवर १० कोटी मिळवू असं सांगितलं असल्याची माहिती त्यागी यांनी पोलिसांना दिली होती. तीन वर्षांनंतर त्यांना अद्याप मुद्दल किंवा त्यावरील कोणताही नफा न मिळाल्याचं सत्येंद्र यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोचलं. 

Web Title: Non-bailable warrant against Remo D'Souza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.