शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:05 IST

Noida Cyber Fraud : ऑनलाइन सुनावणीचे नाटक रंगवले; अधिकाऱ्याला दंडाधिकाऱ्यांसमोरही हजर करण्यात आले.

Noida Cyber Fraud : उत्तर प्रदेशातील नोएडातून सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निवृत्त विंग कमांडरच्या कुटुंबाला ३६ दिवस डिजिटल पद्धतीने अरेस्ट करण्यात आले अन् त्यांच्याकडून तब्बल ३.२२ कोटी रुपये लुबाडले. आरोपींनी या कुटुंबाला अटकेची भीती दाखवली, ज्यामुळे या कुटुंबाने आरोपींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पण, नंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर २५ मध्ये राहणारे निवृत्त विंग कमांडर सुबीर मित्रा आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडली. १८ जुलै रोजी सुबीर यांना एक फोन आला. कॉलरने स्वतःला एका टेलिकॉम कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने दावा केला की, सुबीरच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे आणि त्याद्वारे बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यानंतर सुबीरला व्हिडिओ कॉलद्वारे मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा कॉल आला.

कसे अडकवले जाळ्यात?

सायबर ठगांनी सांगितले की, सुबीर यांच्या नावाने एक बँक खाते उघडण्यात आले आहे, जे जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले गेले आहे. त्यांना अटक वॉरंटदेखील दाखवण्यात आले आणि ताबडतोब मुंबईत येण्याचा दबाव टाकण्यात आला. हे ऐकून साहजिकच सुबीर घाबरले. त्यानंतर, आरोपींनी सांगितले की, जर त्याने तपासात सहकार्य केले तर अटक टाळू शकतात. परंतु यासाठी, कुटुंबासह त्यांना सतत देखरेखीखाली राहावे लागेल आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीला या प्रकरणाचा सुगावा लागू नये. अशा प्रकारे, सुबीर, त्याची पत्नी केया आणि मुलगी मालोबिका गुंडांच्या जाळ्यात अडकले.

विविध खात्यांमध्ये ३.२२ कोटी रुपये ट्रांसफर केलेदुसऱ्या दिवशी, ऑनलाइन सुनावणीचे नाटक रंगवले गेले. सुबीरला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. येथे त्यांना सांगण्यात आले की, जर त्यांना क्लीन चिट हवी असेल, तर त्यांच्या जमा भांडवलाची पडताळणी करावी लागेल. या बहाण्याने त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. सुबीरने २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत त्याच्या आयुष्यातील बचतीतून एकूण ३.२२ कोटी रुपये सहा हप्त्यांमध्ये गुन्हेगारांनी नमूद केलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

सुमारे एक महिना कुटुंबाने आरोपींच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले. फसवणूक करणारे त्यांना धमक्या देत राहिले की, जर त्यांनी सहकार्य केले नाही, तर अटक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. कुटुंब इतके मानसिक दबावाखाली आले की, त्यांनी कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीशी किंवा पोलिसांशी संपर्क साधला नाही. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना ३६ दिवसांत फक्त दोनदाच घराबाहेर पडू दिले.

अचानक त्यांच्याशी संपर्क अन् फसवणूक झाल्याचे समजले जेव्हा पैशाची मागणी वाढत राहिली, तेव्हा कुटुंबाला संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपींनी अचानक त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यानंतरच सुबीर आणि त्यांच्या कुटुंबाला सायबर फसवणुकीला बळी ठरल्याची जाणीव झाली. त्यानंतर मुलगी मालोबिकाने ताबडतोब एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि सायबर क्राइम पोलिस स्टेशनला या प्रकरणाची माहिती दिली. सध्या, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीPoliceपोलिसindian air forceभारतीय हवाई दल