शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलं होईनात, नवऱ्यानेच पत्नीला दीराच्या ताब्यात सोपविले; झाली वासनेची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:20 IST

Rape Case : पीडितेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती, दीर आणि दिराची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ग्वाल्हेर :  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला दोन वर्षे उलटूनही मूल होत नसताना एका पतीने आपल्या इच्छेपोटी पत्नीला मोठ्या भावाच्या स्वाधीन केले. दिराने महिलेवर तीन वर्षे बलात्कार केला. निर्लज्जपणाची परिसीमा ओलांडत पती आणि दिराच्या पत्नीसमोरच महिलेशी दिरासोबत बळजबरीने संबंध ठेवले. यानंतरही मूल न झाल्याने पतीने पत्नीला घरातून हाकलून दिले. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पीडितेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती, दीर आणि दिराची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे 27 वर्षीय विवाहित महिलेने ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तिने सांगितले की, ती भिंडच्या गोहाडची आहे. 2015 मध्ये तिचा विवाह ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिजौली येथील तरुणाशी झाला होता. तिचा नवरा आणि दीर ग्वाल्हेरमध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. लग्नानंतर ती पतीसोबत गोसपुरा येथे भाड्याच्या घरात राहायला आली. येथे तिच्यासोबत दीर आणि दिराची पत्नी राहत होते.महिलेने आपबिती सांगितलीमहिलेने पोलिसांना सांगितले की, लग्नाला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही विवाहितेने पतीला डॉक्टरांकडून चेकअप करून घेण्यास सांगितले, मात्र पती डॉक्टरकडे जाण्यास टाळू लागला. एके दिवशी पतीने विवाहित महिलेला सांगितले की, जर तुम्हाला मुले हवी असतील तर मोठ्या भावाशी संबंध ठेवू. विवाहितेने नकार दिल्याने 20 जुलै 2017 च्या रात्री दीर आणि दिराची पत्नी तिच्या खोलीत आले. दिराच्या पत्नीने आतून दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार घडवून आणला.  

मुलाच्या नावाखाली तीन वर्षे अत्याचार सहन केलेएकदा दिराने विवाहित महिलेला आपला बळी बनवला. त्यानंतर तिची अब्रू लुटण्याचा प्रकार सुरू झाला. पती आणि दिराची पत्नी खोलीत उभे राहून  दिरास विवाहितेवर बलात्कार करायला लावायचे. पीडित तरुणी तीन वर्षांपासून मुलाच्या नावावर पती, दीर आणि दिराची पत्नी यांच्याकडून छळ सहन करत होती. इज्जत जाईल या भीतीने तिने सर्व काही सहन केले. तीन वर्षांपासून मूल हो नाही म्हणून ऑक्टोबर 2020 रोजी पती आणि दीर यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर पती पत्नीसह कानपूरला गेला.तेथेही महिलेसोबतचा छळ काही थांबला नाही. एके दिवशी पतीने पत्नीमधील उणीवा काढून तिला घरातून हाकलून दिले. शेवटी पत्नीने आपल्या माहेरी पोहोचून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती लहान भावाला सांगितली. त्यानंतर विवाहितेला धीर दिल्याने तिने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला. पोलिसांनी पती, दीर आणि दिराची पत्नी यांच्याविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस