शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

"५० लाख द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द संपवून टाकू", अश्लील फोटो पाठवून माजी मंत्र्याकडे मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:35 AM

यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOU मध्ये तक्रार दाखल केली आहे. 

गेल्या काही दिवसांत इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर सायबर गुन्हेगारांनी जाळे पसरले असून अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिक या जाळ्यामध्ये अडकत आहेत. त्यात सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याद्वारे खंडणी मागितल्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, अशाच काहीसा प्रकार बिहारच्या माजी मंत्र्यासोबत घडला आहे. यासंदर्भात त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOU मध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पटना येथील कदमकुआं भागात राहणारे बिहार सरकारचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते वृषिन पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. यामध्ये म्हटले आहे की, दोन मुलींनी त्यांना त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांचे कपडे काढण्यास सुरुवात केली. यानंतर व्हॉट्सअॅपवर एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून ५० लाखांची मागणी केली आहे. 

तसेच, जर पैसे दिले नाहीत तर ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून राजकीय कारकीर्द संपवून टाकू, असे फोनद्वारे वृषिन पटेल यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर वृषिन पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचले आणि ५० लाख रुपयांची मागणी आणि अश्लील फोटो पाठवून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?वृषिन पटेल यांनी आपल्या लेखी तक्रारीत सांगितले की, जवळपास दोन महिन्यांपूर्वी कदमकुआं पोलिस स्टेशन परिसरात एक महिला मला भेटायला आली होती. तिने माझ्या कर्मचार्‍यांना सांगितले की, मला मंत्र्याला भेटायचे आहे. सुरुवातील तिला नकार दिल्यानंतर सुद्धा तिने कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी भेटीची व्यवस्था केली. यानंतर महिलेने मला आमदार व्हायचे असल्याचे सांगितले. मी म्हणालो, ते इतके सोपे नाही. पक्ष कार्यालयात येऊन सभासदत्व घ्या, त्यानंतर लोकांमध्ये जाऊन काम करा.

या घटनेनंतर एके दिवशी कार्यालयाजवळून जात असताना मला ती महिला पुन्हा भेटली. त्यावेळी तिने सांगितले की, माझे घर जवळ आहे. थोड्यावेळासाठी तुम्ही घरी चला. तिच्या विनंतीवरून मी घरी पोहोचलो. तेथे मी तिचा नवरा कुठे आहे? असे विचारले असता महिलेने तो कामावर जात असल्याचे सांगितले. यावेळी दोन मुलीही तेथे उपस्थित होत्या. महिला काही घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर दोन्ही मुलींनी कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्याना ओरडलो आणि तिथून बाहेर पडलो, असे वृषिन पटेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :ExtortionखंडणीCrime Newsगुन्हेगारीBiharबिहार