शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 09:03 IST

विशेष न्यायालयाचा निकाल; मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील अवघ्या साडेसहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी या गंभीर गुन्ह्यात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावून ‘निर्भया’ला न्याय दिला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले; पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. मी हा गुन्हा केलाच नाही, असे आरोपी सांगत होता. न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (२४) असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे, तर सुजाता महिपती दळवी (वय ४८, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) असे त्याच्या आईचे नाव आहे. याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ती खेळत होती आणि...

  • ही घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. त्या दिवशी नागपंचमीनिमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनी गावात शोधमोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी (३ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात मुलीचा मृतदेह आढळला. 
  • तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून चोवीस तासांत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे ॲड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.

 

  • मुख्यमंत्र्यांच्या मदतीची प्रतीक्षाच

- या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.- त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑगस्ट २०२२ रोजी पीडितेच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, अद्यापही ही मदत मिळाली नसल्याचे ‘निर्भया’चे वडील जनार्दन अनंत चांदेकर यांनी सांगितले. - आमची ‘ती’ एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर आम्हाला चार वर्षांनी मुलगी झाली. ‘ती’ नाही याचे दु:ख न विसरण्यासारखे आहे. आज तिला न्याय मिळाला, याचे समाधान आहे, अशी भावना देखील चांदेकर कुटुंबियांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळDeathमृत्यू