शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फाशीचे तख्त तयार; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकाच वेळी फासावर लटकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 19:40 IST

आता ४ तख्त तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत येथे फाशी देण्याकरिता एकच तख्त तयार करण्यात आले होते तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केले.

नवी दिल्ली - तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारात चार दोषींना शिक्षा देण्यासाठी तयार केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. आता तिहार कारागृह हे देशातील पहिले कारागृह असणार आहे, जेथे एकाच वेळी चार दोषींना फासावर एकाच वेळी लटकविण्यासाठी फाशीचे तख्त तयार केले जात आहेत. आतापर्यंत येथे फाशी देण्याकरिता एकच तख्त तयार करण्यात आले होते, परंतु आता ४ तख्त तयार करण्यात आले आहे.तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केले. हे काम पूर्ण करण्यासाठी कारागृहामध्ये जेसीबी मशीन देखील आणली होती, असे तिहार कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले. अशी माहिती आजतकने दिली आहे. या जेसीबीच्या सहाय्याने फाशी देण्यासाठी अतिरिक्त तीन तख्त तयार करण्यात आले असून सुरुंग (बोगदा) देखील तयार करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाशीच्या तख्ताखाली बोगदा बनविला जातो. फासावर लटकविलेल्या दोषीचा मृतदेह या बोगद्यातून बाहेर काढला जातो.६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशीवर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पटियाला हाऊस कोर्टात ७ जानेवारी रोजी अक्षय, पवन, विनय आणि मुकेश यांच्या दोषी फाशीच्या डेथ वॉरंटवर सुनावणी होणार आहे. दोषींनी तिहार कारागृह प्रशासनाला क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी पत्र लिहिले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, १९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली होती. क्यूरेटिव अर्ज एका महिन्यात करता येतो. नंतर दया याचिका हा शेवटचा पर्याय असतो. मात्र, निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरण हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असून या चार आरोपींना फाशीपासून सुटकेची काही आशा करता येत नाही.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयjailतुरुंग