शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:01 IST

तिहार तुरुंग प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात धाव घेतली आहे. 

ठळक मुद्देचार दोषींपैकी एक विनय कुमार शर्माची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली आहे. मुकेश यांची दया याचिका १७ जानेवारीला राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे.दोषींना कधी फाशी दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय कुमार शर्माची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली आहे. त्यामुळे तो फाशीच्या जवळ आला आहे. क्युरेटिव्ह याचिका यापूर्वीच फेटाळून लावण्यात आली आहे. मुकेश याची दया याचिका १७ जानेवारीला राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. परंतु, दोषींना कधी फाशी दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे आता विनयची दया याचिका फेटाळल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात धाव घेतली आहे.  

दोषी विनयने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दया याचिका पाठविली होती, अशी विनयचे वकील ए. पी. सिंग यांनी ही माहिती दिली. १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेतीळ दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षयसिंग ठाकूर यांना दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ता यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. या गुन्ह्याच्या वेळी त्याने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. तो दावा न्यालयाने फेटाळून लावला. नंतर या आदेशाविरोधात पवन याने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळलीया गुन्ह्याच्या वेळी म्हणजेच १६ डिसेंबर २०१२ मध्ये पवन हा अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. तथापि, हा दावा खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आला आहे. परंतु हा दावा फेटाळून लावण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरूद्ध त्याने आता ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पवन याने शुक्रवारी याचिका दाखल केली होती आणि तातडीने या प्रकरणाचा विचार करून सुनावणी घेऊन सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.न्या. आर. भानुमति, अशोक भूषण आणि ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने पुनर्विचार याचिका व त्यासमवेत दाखल केलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पाहणी करून त्यांनी याचिका फेटाळून लावली. पवन गुप्ता हा दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी एक आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पवनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळली आहे. परंतु पवन याने अद्याप सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही किंवा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली नाही. त्यामुळे त्याच्याकडे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोन कायदेशीर पर्याय आहेत.

Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय