Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:55 PM2020-02-20T20:55:44+5:302020-02-20T20:59:02+5:30

Nirbhaya Case : दिल्ली सरकारने दया याचिका फेटाळल्याविरोधात आव्हान देत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल दाखल आहे. 

Nirbhaya Case: Now this convict run towards the Election Commission | Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव  

Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव  

Next
ठळक मुद्देविशेष अधिकाऱ्याने (ओएसडी) स्क्रीनशॉटच्याद्वारे याचिकेवर स्वाक्षरी चिकटवली होती. निर्भयाच्या दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आजतागयत अनेक शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने आता ते नव्या युक्त्या लढवत आहेत.

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता निवडणूक आयोगाकडे दोषीने धाव घेतली आहे. या प्रकरणातील दोषी विनय शर्माने फाशी टाळण्यासाठी आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. निर्भयाच्या दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आजतागयत अनेक शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने आता ते नव्या युक्त्या लढवत आहेत. दिल्लीसरकारने दया याचिका फेटाळल्याविरोधात आव्हान देत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल दाखल आहे. 

दिल्ली सरकारने दया याचिका फेटाळली, त्यावेळी दिल्लीत आचारसंहिता लागू होती. आप पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी दया याचिका फेटाळली होती. ३० जानेवारीला आम्ही दिल्ली सरकारकडे दया याचिका आम्ही दाखल केली होती असून ते गृहमंत्री किंवा आमदार नव्हते कारण त्यावेळी आचारसंहिता लागू झाली होती, अशी माहिती विनयचे वकील ए. पी. सिंग यांनी दिली. तसेच मूळ स्वाक्षरी नव्हती. त्यांच्या विशेष अधिकाऱ्याने (ओएसडी) स्क्रीनशॉटच्याद्वारे याचिकेवर स्वाक्षरी चिकटवली होती. जर त्यांचे ओएसडी आमदार नाहीत, तर गृहमंत्र्यांच्या पदाचा गैरवापर ते कसे करू शकतात? निवडणूक आचारसंहितेत, आदर्श आचारसंहितेत याबाबत काय तरतूद आहे, असा प्रश्‍न सिंग यांनी उपस्थित केला आहे.

Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषी विनयने डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटून घेतलं. यानंतर तुरुंग प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. 

 

Web Title: Nirbhaya Case: Now this convict run towards the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.