शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:55 IST

Nirbhaya case : राष्ट्रपती या याचिकेवर निर्णय घेईपर्यंत कोर्टाने डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद दोषीचे वकील ए.पी. सिंह यांनी केला.

ठळक मुद्देआता पुढच्या आदेशानंतर चौथे डेथ वॉरंट जारी केले जाईल. कोर्टाने सिंग यांना फटकारले की, तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात. 

नवी दिल्ली - पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत निर्भया प्रकरणातील चार दोषींच्या उद्या होणाऱ्या फाशी शिक्षेला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर ताटाकल दोषी पवन गुप्ता यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली. राष्ट्रपती या याचिकेवर निर्णय घेईपर्यंत कोर्टाने डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी असा युक्तिवाद दोषीचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. यावर तिहार प्रशासनाने कोर्टाला सांगितले की, आता न्यायाधीशांची कोणतीही भूमिका नाही, राष्ट्रपती आमच्याकडे अहवाल मागतील, तोपर्यंत दोषींना फाशी देणे थांबवले जाईल. कोर्टाने दोषींच्या वकिलांना फटकारले आणि सांगितले की, तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात. 

पटियाला हाऊस कोर्टात काय घडले…*मंगळवारी सकाळी ६ वाजता दोषी अक्षय सिंगला फाशीचे वॉरंट स्थगित ठेवण्याची विनंती खटल्यात कोर्टाने फेटाळून लावली. राष्ट्रपतींकडे नवीन दया याचिका दाखल करावी, असेही त्यांनी शनिवारी सांगितले होते. आता चारही दोषींनी विनय शर्मा, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय सिंग असे सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत.*पवन यांचे वकील ए.पी. सिंग यांना क्युरेटिव्ह आणि दया याचिकेस उशीर झाल्याबद्दल कोर्टाने फटकारले. न्यायाधीश म्हणाले की, जर तुम्ही एखाद्याच्या वतीने काही चुकीचे पाऊल उचलले तर त्याचे निकाल तुमच्यासमोर असतील. कोर्टाने सिंग यांना फटकारले की, तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात. 

 

*तिहार जेल प्रशासनाने कोर्टाला सांगितले की,  दया याचिका दाखल केल्यानंतर राष्ट्रपती स्टेटस रिपोर्ट विचारतील, जो आपोआप फाशी देऊन निलंबित होईल. आता बॉल सरकारच्या कोर्टात आहे आणि त्यात कोर्टाची कोणतीही भूमिका नाही.

*पुढील आदेश येईपर्यंत कोर्टाने चारही दोषींच्या फाशीवर स्थगिती दिली. आता डेथ वॉरंटनुसार दोषींना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार नाही.

*तिहारमध्ये दोषींच्या डमीला तिसऱ्यांदा फाशी देण्यात आली 

*तिहार जेल प्रशासनाने सांगितले की, सोमवारी जल्लाद पवनने तुरूंगातील चार दोषींना डमी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. दोषींच्या डमीलाही २७ आणि १२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. तिहार जेल अधिकाऱ्यांनी दोन्ही वेळा ही प्रक्रिया पूर्ण केली. दोषींना फाशी देण्यापूर्वी ही प्रक्रिया तालीम मानली जाते. चारही दोषींची डमी त्यांच्या वजनानुसार तयार केली गेली.

Nirbhaya Case Verdict : फाशीचीच शिक्षा, दोषी पवनची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

 

Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव 

 

Nirbhaya Case Hearing : निर्भयाच्या दोषींना आता 3 मार्चला फाशी होणार, डेथ वॉरंट जारी 

 

यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, कोर्टाने 31जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट होते. आता पुढच्या आदेशानंतर चौथे डेथ वॉरंट जारी केले जाईल. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयPresidentराष्ट्राध्यक्ष