Nirbhaya Case Verdict : फाशीचीच शिक्षा, दोषी पवनची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:03 PM2020-03-02T13:03:07+5:302020-03-02T13:05:57+5:30

Nirbhaya Case Verdict : उद्या फाशी देण्यासाठी  काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

Nirbhaya case: Supreme Court rejects curative plea of Pawan, sentenced to death still remain same pda | Nirbhaya Case Verdict : फाशीचीच शिक्षा, दोषी पवनची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Nirbhaya Case Verdict : फाशीचीच शिक्षा, दोषी पवनची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Next
ठळक मुद्देक्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीत पार पडली. दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली होती. आता पवनकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा अजून एक पर्याय उपलब्ध आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली. फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात यावे अशी विनंती त्यानं या याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने पवनची याचिका फेटाळली. तसेच उद्या फाशी देण्यासाठी  काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

न्या. रोहिंग्टन फली नरीमन, न्या. आर. भानुमती, न्या. अशोक भूषणन्या, एन. व्ही. रमन्ना आणि न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सकाळी १०.२५ वाजता पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली. क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीत पार पडली. यापूर्वी उर्वरित तीन दोषींची क्युरेटिव्ह याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.

घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता असल्याचा उल्लेख त्याने याचिकेत याआधी केला होता. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. आता पवनकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा अजून एक पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली होती. कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

 

 

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली

Nirbhaya Case : निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय

 

Supreme Court dismisses convict Pawan Gupta

Read in English

Web Title: Nirbhaya case: Supreme Court rejects curative plea of Pawan, sentenced to death still remain same pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.