Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:28 PM2020-03-19T15:28:15+5:302020-03-19T15:33:40+5:30

अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.

Nirbhaya Case : To be hanged tomorrow; Upon hearing this, the convict's wife fall down unconsiously in front of the court pda | Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली

Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली

Next
ठळक मुद्देसुनावणीच्या वेळी पुनिता देवी तेथे हजर राहिली नाही. या प्रकरणात सुनावणी २४ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  पहिली दया याचिका फेटाळल्यामुळे दोषी अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांची दुसरी दया याचिका ऐकून घेऊ नये. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात या पवन, अक्षय, मुकेश आणि विनय या चार दोषींना उद्या किंवा शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, कोर्टाबाहेर दोषी अक्षयची पत्नी पुनिता देवी बेशुद्ध पडून खाली कोसळली. अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, पुनीता सुनावणीला हजर नव्हती. त्यामुळे, आता हे सर्व फाशी टाळण्यासाठी केले गेलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.



अक्षय ठाकूरची पत्नी पुनिता देवी यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आज बिहार येथील औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयातही कोर्टात सुनावणी होणार होती, परंतु सुनावणीच्या वेळी पुनिता देवी तेथे हजर राहिली नाही. या प्रकरणात सुनावणी २४ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. २० मार्चला म्हणजेच उद्या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत असा विश्वास आहे की हे सर्व फाशीची शिक्षा टाळण्यासाठी योजलेली युक्ती आहे.


निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात कायदेशीर सवलत मिळालेल्या चारही दोषींच्या कोर्टाकडून कोणतीही याचिका प्रलंबित नसल्याचे दिल्लीतील कोर्टाने आज सुनावणीदरम्यान सांगितले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांना सरकारी वकिलाने सांगितले की, पहिली दया याचिका फेटाळल्यामुळे दोषी अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांची दुसरी दया याचिका ऐकून घेऊ नये. 

 

Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी



चार दोषींना फाशी देणे निश्चित झाले
या खटल्यातील चार दोषींपैकी तीन जणांनी त्यांची फाशीची शिक्षा सुनावण्यास स्थगिती मिळावी यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. त्यातील एकाची आणखी एक दया याचिका प्रलंबित आहे. ५ मार्च रोजी कनिष्ठ कोर्टाने मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) यांना फाशी देण्याचे नवीन चौथे डेथ वॉरंट बजावले. या चारही दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता फाशी देण्यात येईल.

Web Title: Nirbhaya Case : To be hanged tomorrow; Upon hearing this, the convict's wife fall down unconsiously in front of the court pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.