PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:24 IST2019-06-12T15:23:50+5:302019-06-12T15:24:15+5:30
Punjab National Bank Scam: आज चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर केला आहे.

PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला
लंडन - पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीचालंडनमधील रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिजने जामीन अर्ज फेटाळला आहे. आज चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर केला आहे. मात्र, अलीकडेच नीरवसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. १२ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याचे वृत्त चर्चेत होतं.
नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
लंडन - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा जामीन लंडनमधील न्यायालयाने नाकारला https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2019
PNB Scam case: The Royal Courts of Justice in London denies bail to Nirav Modi. pic.twitter.com/Bnnpfipzpo
— ANI (@ANI) June 12, 2019