शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

लाखोंचा आर्थिक गंडा घालणारी नायजेरीयन टोळी जेरबंद;सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:26 IST

हर्बल ऑईलच्या नावाखाली २१ लाखांना घातला होता गंडा, ५ जणांना अटक

ठळक मुद्देअधिक तपासासाठी २०जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर

पुणे : हर्बल ऑईल व्यवसायाची ऑफर देऊन महिलेला २१ लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरीन टोळीला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर येथून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून २ लॅपटॉप,बनावट हर्बल ऑईलच्या ५बाटल्या, १६ मोबाईल, ३० हजार रुपये, डेबिड कार्ड असा ऐवज जप्त केला आहे.राधा नेल्सन कॅस्टन (वय३७, रा. हेलन हाऊस, जुहु, मुंबई), अलेक्सइलेचुकवु आरिन्झे ( वय ३३), ग्युयेड फ्रान्सिस (वय ३८), ओकोको ओकोरोन्वाआमामा (वय ३८), कालु ईलेचुकवु (वय २७, सर्व रा. खारघर, मुंबई, मुळ- नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली होती. या महिलेची टणटण या सोशल संकेतस्थळावर रोज नावाच्या महिलेशी ओळख झाली होती.रोज नाव सांगणाऱ्या महिलेने फियार्दीशी मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला जादा नफा कमविण्यासाठी हर्बल ऑईलचा व्यवसाय करण्याची ऑफर दिली. होणाऱ्या नफ्यामधून ४० टक्के नफा तिला देण्याची अट ठेवली. त्यानुसार व्यवसायाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणासाठी तिला वेळोवेळी २१ लाख २३ हजार ३२५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरायला सांगितले. आपली फसवणुक झाल्याचे या महिलेला लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच त्यांना एक महिला व्यवसायाच्या अनुषंगाने हर्बल ऑईलचे सॅम्पल बाटली घेऊन मुंबईहून पुण्यात येणार असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राधा नेल्सन कॅस्टन हिला पकडले. त्यांच्याकडून एक मोबाईल, २ बनावट हर्बल ऑईलच्या बाटल्या, डेबीट कार्ड जप्त करण्यात आले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिचे साथीदार खारघर येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी आणखी ४ जणांना पकडले. या टोळीने भारतामध्ये अशा प्रकारे आणखी काही जणांना गंडा घातला असल्याची शक्यता आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी २०जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक अनिल डफळ, पडवळ, पोलीस नाईक दीपिका मोहिते,नितेश शेलार आदींनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीArrestअटक