शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

उन्मेष जोशींची दुसऱ्या दिवशीही 8 तास प्रश्नांची सरबत्ती;राजन शिरोडकर यांचीही कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:40 IST

त्यांच्या कंपनीतील तत्कालिन भागीदार व बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांच्याकडे पाच तास चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देअद्याप ती पुर्ण न झाल्याने बुधवारी पुन्हा दोघांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.ना कार्यालयात बसवून घेवून अधिकाऱ्यांनी व्यवहारांच्या अनुषंगाने माहिती घेतली.

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुन्हा आठ तास चौकशी केली.गृह प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्या कंपनीतील तत्कालिन भागीदार व बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांच्याकडे पाच तास चौकशी करण्यात आली. अद्याप ती पुर्ण न झाल्याने बुधवारी पुन्हा दोघांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.दादर (प) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे(आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालिन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांच्यावर चौकशीचा समेमिरा मागे लावला आहे. राज यांच्याकडे गुरुवारी चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजाविले आहे. तर उन्मेष जोशी यांची सोमवारी आठ तास चौकशी केली होती. त्यांना कार्यालयात बसवून घेवून अधिकाऱ्यांनी व्यवहारांच्या अनुषंगाने माहिती घेतली. सुमारे तीन तासानंतर राजन शिरोडकरही आले. अधिकाºयांनी दोघांना समोरासमोर बसवून विचारणा करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या अनुषंगाने व्यवहारासंबंधी कागदपत्रे, दस्ताऐवजाच्या प्रती घेण्यात आल्याचे समजते. दोघेजण सांयकाळी सातच्या सुमारास दोघे कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी प्रलंबित असल्याने त्यांना बुधवारी पुन्हा कार्यालयात हजर रहाण्यास सांगण्यात आले आहे.ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता जोशी यांनी कोहिनूर मिल प्रकल्पाच्या अनुषंगाने चौकशीबद्दलची माहिती देत असल्याचे सांगितले. तर शिरोडकर यांनी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे मागितलेली कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात आलो होतो. उद्या पुन्हा आपल्याला बोलाविलेले असल्याचे त्यांनी सांगितले.ईडी कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्तईडीने मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजाविलेल्या नोटीसामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.गुरुवारी ते दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील कार्यालयात हजर रहाणार असलेतरी चौकशीमुळे मनसे सैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी होण्याच्या शक्यतेने मंगळवारपासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. गुरूवारी आणखी वाढविला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे