शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइकची बातमी लीक! टीप मिळाल्यानेच नागपुरातून पळाले बुकी; 'या' बड्या शहरांत आहेत अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 00:08 IST

जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते.

नागपूर: एकाचवेळी बहुतांश मोठ्या बुकींवर पोलीस हात टाकणार आहेत, अशी माहिती लीक झाल्यामुळे कारवाईपूर्वीच शहरातील सर्वच बडे बुकी नागपूरबाहेर पळून गेले. त्यांच्यातील काहींनी गोवा, काहींनी मुंबई, तर काहींनी परप्रांतात धाव घेत आपले अड्डे सुरू केले.

नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये क्रिकेट सट्ट्याचे अड्डे थाटून बुकींनी कोट्यवधींची लगवाडी खयवाडी चालविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी वेळोवेळी प्रकाशित केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांनी शहरातील ‘बुकींवर सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची योजना बनविली होती. त्यानुसार, टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्याला रविवारी सुरुवात झाली आणि पोलिसांनी एकाच वेळी अनेक बड्या बुकींकडे छापेमारी केली. मात्र, कोणताही मोठा बुकी पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांच्या हाती फिरोज रफिक शेख (वय ४९, रा. शुक्रवारी तलावाजवळ, गणेशपेठ), पीयूष अग्रवाल (वय ३६, रा. लकडगंज), अशोक ऊर्फ गुप्ता ऊर्फ तुलसीराम गुप्ता, राहुल रमेश अग्रवाल (वय ४६, रा. बजेरिया, गणेश पेठ), प्रवीणकुमार ऊर्फ चिंटू चाैरसिया (वय ३२, रा. गड्डीगोदाम) आणि सोनू चहांदे (वय ४५, रा. गड्डीगोदाम) हे सहा बुकी सापडले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त चिन्मय पंडित यांनी उपरोक्त बुकींची मध्यरात्रीपर्यंत ‘खास खातीरदारी’ केली. त्यांच्याकडून ‘बुकी बाजाराबाबत’ महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मोकळे करण्यात आले. तत्पूर्वी पोलीस धडाकेबाज कारवाई करणार असल्याचे कळाल्याने बड्या बुकींपैकी कमाल जहांगिरने गोवा, सिराज खानने बांद्रा (मुंबई), अर्जुन राजपूतने खार (मुंबई), बंटी, कमनानी, पंकज कडी, सोनू परीने अकोल्यात आश्रय शोधला, तर मनीष, बंटी ज्यूस, बॅटरी गुल, अतुल धरमपेठ तोतवणीसह अनेक बडे बुकी शहर सोडून वेगवेगळ्या शहरात  पळून गेले. काहींनी रायपूर, भोपाळ, पांढुरण्याकडे धाव घेतली.

विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मोजक्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांना बुकींवर सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, ठिकठिकाणी छापेमारीही झाली मात्र कोणताही मोठा बुकी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे दलातील घरभेद्यानेच बुकींना कारवाई होणार असल्याची माहिती कळवली असावी, असा संशय आहे. त्याचीही वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार पोलीस आता पुढच्या कारवाईची व्यूहरचना करणार आहेत.

अलेक्झांडर सेमिनरी हिलमधून गायब -जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते. मध्य भारतातील टॉप टेनमध्ये गणना होणारा कुख्यात बुकी अलेक्झांडर दुपारी सेमिनरी हिल्स परिसरात होता. ३ वाजताच्या सुमारास त्याला कारवाई होणार असल्याची भनक लागली. त्यामुळे तो आणि त्याच्यासारखेच अनेक बडे बुकी आपापले मोबाइल बंद करून शहरातून गायब झाले. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी रात्री ११ वाजेपर्यंत प्रयत्न केले. मात्र ते हाती लागले नाही.

टॅग्स :nagpurनागपूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी