शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवं वळण; पोलिसांना ३ शंका, दोघांमध्ये हा तिसरा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:29 IST

उरणमधील तरुणीच्या हत्येमागे नेमका काय उद्दिष्ट आहे याचा पोलीस सर्व अँगलने शोध घेत आहे. त्यात ३ शक्यता पोलिसांनी वर्तवल्या आहेत.

उरण - २० वर्षीय यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील दाऊद शेख नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊदनं ६ वर्षापूर्वी मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं आणि तो जेलमध्ये गेल्याचं समोर आलं. परंतु यशश्रीच्या हत्येमागचा उद्देश काय हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास करत आहेत.

ज्याच्यावर संशय तोच खूनी

सीसीटीव्ही फुटेजद्वारे २० वर्षीय यशश्रीच्या हत्येत दाऊद शेख असल्याचं स्पष्ट आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा येथून दाऊदला पोलिसांनी अटक केली. सुरुवातीच्या तपासात दाऊदनं यशश्रीच्या हत्येची कबुलीही दिली आहे. मात्र त्याने ही हत्या का केली याबाबत स्पष्टता नाही. जेव्हा आरोपीला नवी मुंबईत आणून चौकशी केली जाईल तेव्हा याचं रहस्य बाहेर येऊ शकते. 

दाऊद नेहमी होता यशश्रीच्या संपर्कात

पोलीस सूत्रांनुसार, त्यांच्याकडे यशश्रीच्या मोबाईलचे सीडीआर मिळालेत. त्यातून ती दाऊद शेखसोबत संपर्कात होती. तिचे बोलणं व्हायचं. गुरुवारीही तिचं दाऊदसोबत अनेकदा बोलणं झालं होते. त्यामुळे दाऊदनं फोन करून बोलवल्यावरच ती भेटायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. मात्र यशश्रीची हत्या ३ कारणास्तव झाली असावी असा पोलिसांना संशय आहे.

शक्यता १ - बदल्याच्या भावनेने घेतला जीव?

दाऊद शेखने २०१९ मध्ये यशश्रीसोबत मैत्री करत तिचं लैंगिक शोषण केले. तेव्हा यशश्री अल्पवयीन होती. त्यामुळे यशश्रीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आणि दाऊद जेलला गेला. जेलमधून सुटल्यानंतर बदल्याच्या भावनेने दाऊद शेखनं यशश्रीचा खून केला असावा अशी शक्यता आहे. त्या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.

शक्यता २ - लव्ह ट्राय अँगलनं घेतला जीव?

दाऊद शेख आणि यशश्री यांच्यात ओळख होती, दोघे एकमेकांच्या संपर्कात होते हे स्पष्ट आहे. त्यात पोलिसांनी कर्नाटकात राहणाऱ्या मोहसिन नावाच्या आणखी एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे ज्याच्यासोबत यशश्रीचं बोलणं व्हायचे. त्यामुळे या हत्येमागे लव्ह ट्राय अँगल असू शकते, ज्यात मोहसिनसोबत बोलत असल्याने दाऊद यशश्रीवर रागवायचा आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचचले? या फक्त शक्यता आहेत, खरी कहाणी दाऊदच्या चौकशीनंतरच समोर येऊ शकते.

शक्यता ३ - लग्नाच्या चक्करमध्ये झाला खून?

पोलिसांना आणखी एक शंका आहे ती म्हणजे लग्नामुळे दोघांमध्ये वाद होता. दाऊदला यशश्रीसोबत लग्न करायचं होते, परंतु त्यासाठी मुलगी तयार नव्हती. हे दोघेही वेगवेगळ्या धर्मातून येत होते. यशश्रीच्या घरच्यांनी पॉस्को अंतर्गत तक्रार करत दाऊदला जेलला पाठवलं होते. अशात यशश्रीच्या घरचे या नात्याला तयार नव्हते, त्यामुळे यशश्रीही त्यासाठी राजी नव्हती. त्यामुळे तिने दाऊदशी लग्न करण्यास नकार दिला. ज्याचा राग मनात ठेवत दाऊदनं तिला भेटायला बोलावलं आणि जीव घेतला. सध्या दाऊद नवी मुंबईत पोहचण्याची पोलीस वाट पाहत आहेत. त्यानंतरच हत्येमागची कहाणी सर्वांसमोर येईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी