शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:30 IST

दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते...

राजा रघुवंशी हत्येप्रकरणी, पोलिसांनी सोनम रघुवंशी हिला अटक केली आहे. ती साधारणपणे २ आठवड्यांपासून बेपत्ता होती. राजाच्या हत्येत तिचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोनम स्वतःला निर्दोष म्हणत असल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर ती अपहरणाचा दावाही करत आहे. तथापि, पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे. सोनम व्यतिरिक्त आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. राजाचा मृतदेह २ जून रोजी एका दरीत आढळला होता. तर, सोनम बेपत्ता होती. दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते.

न्यूज१८ ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण आरोपी नसून, या प्रकरणातील पीडित आहोत. अपहरण केल्यानंतर आपल्याला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सोडण्यात आले होते. यानंतर आपण तेथून आपल्या भावाला फोन केला, असा दावा सोनमने केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या फोन कॉलसंदर्भात, कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर, पोलिसांनी सोनमला अटक केली.

मेघालयाच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) आय नोंगरांग यांनी सोमवारी पीटीआय-भाषाला दिलेल्या माहितीनुसार, राजाची पत्नी सोनम हिने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तर रात्रभरात केलेल्या छापेमारीत इतर तिघांना अटक करण्यात आली.

नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन जणांपैकी दोघे मध्य प्रदेशातील इंदूर आणि एक उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील आहे. 'एक आरोपी उत्तर प्रदेशातून पकडला गेला आणि इतर दोन आरोपींना विशेष तपास पथकाने (एसआयटी) इंदूर येथून पकडले. 'सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर तिला अटक करण्यात आली.'

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश