शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वर्षभरात 8 मुलांवर लावले बलात्काराचे आरोप, 'ब्लॅकमेल गर्ल' पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:31 IST

तरुणी डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये वसुली करायची. या सर्व कामात त्या तरुणीची आईदेखील तिला मदत करायची.

नवी दिल्ली:दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसुल करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.

आई करायची मदतमिळालेल्या माहितीनुसार, न्यू कॉलनी पोलिसांनी बलात्काराचे खोटे आरोप करुन मुलांना लुटणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या तरुणीच्या ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या खेळाचा भांडाफोड झाला. या साऱ्या खेळात अटक करण्यात आलेल्या मुलीची आई आणि तिचा साथीदारही सामील होता. सध्या, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुरुग्रामचे एसीपी क्राइम प्रीतपाल सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

अशी करायची फसवणूकमुलीच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित मुलाने सांगितले की, 20 ऑगस्ट रोजी तो डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणीला भेटला. मुलीने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले. 23 ऑगस्टपर्यंत त्याला मजबूर करुन तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पद्धतशीरपणे इतर काही तरुणांना अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले. या सगळ्यातून तरुणीने लाखोंची वसुली केली आहे.

पोलिसांत खोटे गुन्हे दाखलपोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी तरुणीने राजेंद्र पार्क, न्यू कॉलनी, ठाणे शहर, ठाणे सदर, सेक्टर 10, सिव्हिल लाइन्स, डीएलएफ फेज-1 आणि सायबर क्राइम पोलिसांत वर्षभरात एकूण 7 तरुणांविरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलिस तपासात दोन प्रकरणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तरुणीने 15 महिन्यांत 8 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस