शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भाचाच निघाला मारेकरी; जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:03 IST

Murder Case : आरोपीला यवतमाळातून अटक  

ठळक मुद्दे पवन श्रीराम मंगाम (३३, रा. लोहारा, यवतमाळ) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. मृत मोहन पेंदुरकर हे यवतमाळ येथील विश्वशांतीनगरचे रहिवासी होते.

महागाव (यवतमाळ) : येथील तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) मोहन पेंदुरकर (५९) यांचा त्यांच्याच भाच्याने जुन्या वैमनस्यातून खून केला. आरोपीला पोलिसांनीयवतमाळातूनअटक केली आहे.

 पवन श्रीराम मंगाम (३३, रा. लोहारा, यवतमाळ) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. मृत मोहन पेंदुरकर हे यवतमाळ येथील विश्वशांतीनगरचे रहिवासी होते. गुरुवारी रात्री फुलसावंगीनजीक पिंपळगाव फाटा येथे त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावरून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार विलास चव्हाण यांच्या सतर्कतेने आरोपीला केवळ चार तासांमध्ये अटक करण्यात आली.

पवन मंगाम याच्या कुटुंबासोबत पेंदूरकर यांचा जुना वाद होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी पवन गेल्या काही दिवसांपासून मामाची हत्या करण्याची संधी शोधत होता. मामा मदत करीत नसल्याने त्यांचा काटा काढण्याची योजना त्याने तयार केली होती. गुरुवारी सायंकाळी पवन हा महागाव येथे मोहन पेंदुरकर यांच्याकडे  तहसील कार्यालय परिसरातील शासकीय निवासस्थानी आला होता. मामाने काही दिवसांपूर्वी घेतलेली जुनी कार (एम.एच. २० सी.एच. ०८४०) शिकविण्याच्या बहाण्याने ते दोघेही ५.३० वाजता महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर गेले. पिंपळगाव फाटा येथे या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी पवनने सोबत आणलेल्या कैचीने मामाच्या छाती आणि डोक्यात सपासप वार केले. त्यामुळे पेंदुरकर जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. ते मृत झाल्याची खात्री होताच आरोपीने सरळ यवतमाळ येथे पोबारा केला होता.

तातडीने फिरविली तपास चक्रेघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी तातडीने चक्रे फिरविली. प्रथम पेंदुरकर यांचा  अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता पसरली होती. मात्र, घटनास्थळावर कोणतेही वाहन आढळून आले नाही. सवना येथे पेंदुरकर यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच १० वाजता आरोपीला यवतमाळ येथून कारसह अटक करण्यात आली. रात्री १ वाजता त्याला महागाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीने खुनाची कबुली दिल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध भादंवी ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकYavatmalयवतमाळPoliceपोलिसTahasildarतहसीलदार