शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:22 IST

नेपाळ पोलिसांनी या कटात सामील असलेल्या ३२ जणांवर संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

जगातील सर्वोच्च शिखरावर चढताना तुम्ही ज्यांना आपला गाईड मानला, आधार म्हणून विश्वास ठेवता, जर तेच पैशांसाठी तुमच्या जीवावर उठले तर काय होईल? नेपाळमध्ये सध्या हेच घडत आहे. माउंट एव्हरेस्टच्या गाईड्सवर असा गंभीर आरोप आहे की, ते पर्यटकांच्या अन्नात गुपचूप काही पदार्थ मिसळून त्यांना आजारी पाडत होते, जेणेकरून हेलिकॉप्टरने रेस्क्यू करता येईल. हा तब्बल २ कोटी डॉलर्सचा (जवळपास १९० कोटी) इन्शुरन्स क्लेम' म्हणजेच विमा घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात नेपाळपोलिसांनी या कटात सामील असलेल्या ३२ जणांवर संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. 'काठमांडू पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, या प्रकरणात ट्रेकिंग कंपन्यांचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि रुग्णालयातील अधिकारी सामील आहेत.

कसा सुरू होता हा जीवघेणा स्कॅम?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेकिंग एजन्सीचे गाईड पर्यटकांच्या अन्नात बेकिंग सोडा मिसळून त्यांना आजारी पाडत असत. यामुळे पर्यटकांचं पोट बिघडत असे, जे दिसायला 'अल्टीट्यूड सिकनेस' (उंचीवर गेल्यामुळे होणारा त्रास) किंवा फूड पॉयझनिंगसारखं वाटत असे. पर्यटक आजारी पडल्यावर, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना महागड्या इमर्जन्सी हेलिकॉप्टरने खाली नेण्यासाठी (इव्हॅक्युएशन) तयार केलं जायचं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर कंपन्या बनावट वैद्यकीय आणि उड्डाण कागदपत्रं तयार करून आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपन्यांकडून पैसे उकळत होत्या.

एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक प्रवासी, पण बिल मात्र स्वतंत्र

या रिपोर्टनुसार, जेव्हा रेस्क्यू हेलिकॉप्टर बोलावलं जायचं, तेव्हा खरी कमाई सुरू व्हायची. एकाच हेलिकॉप्टरमधून अनेक प्रवाशांना नेलं जायचं. परंतु, प्रत्येक प्रवाशाच्या विमा कंपनीला स्वतंत्र आणि पूर्ण भाड्याचे बिल पाठवले जायचे, जणू काही प्रत्येक प्रवाशासाठी वेगळे हेलिकॉप्टर उडवले गेले आहे. उदाहरणार्थ, ४,००० डॉलर्सच्या हेलिकॉप्टर उड्डाणाचं रूपांतर १२,००० डॉलर्सच्या विमा क्लेममध्ये केलं जात असे.

बनावट फ्लाईट रेकॉर्ड आणि लोड शीट

यासाठी बनावट फ्लाईट रेकॉर्ड आणि लोड शीट तयार केली जात होती. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अशा रुग्णांचे 'डिस्चार्ज समरी' बनवत असत, ज्यावर वरिष्ठ डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या असायच्या, तर प्रत्यक्षात ते डॉक्टर त्या उपचारात सामीलही नसायचे. काही प्रकरणांमध्ये हे काम डॉक्टरांच्या नकळत केले गेले. अनेकदा अशा पर्यटकांच्या नावे रुग्णालयात दाखल झाल्याचे बनावट रेकॉर्ड तयार केले गेले, जे प्रत्यक्षात उपचारच घेत नव्हते.  या चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे गाईड्स, हेलिकॉप्टर कंपन्या, ट्रेकिंग एजन्सी आणि ज्या रुग्णालयात पर्यटकांना उपचारासाठी नेले जात असे, त्यांच्यात विभागले जात असत. या प्रकरणाचा तपास जानेवारीत सुरू झाला होता, जेव्हा तीन प्रमुख रेस्क्यू कंपन्यांच्या सहा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

घोटाळा होण्याची ही पहिलीच वेळ नाही

चिंतेची बाब म्हणजे नेपाळच्या पर्यटन उद्योगात असा घोटाळा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा उद्योग देशातील १० लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार देतो. वाढत्या फसवणुकीमुळे अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नेपाळमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांना विमा कवच देणं बंद केलं आहे. २०१८ मध्ये नेपाळ सरकारने असा दावा केला होता की, त्यांनी सर्व "मध्यस्थांना" हटवलं आहे, मात्र अद्यापही अशी प्रकरणं समोर येत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Everest Scam: Guides Poison Tourists for Insurance Money, $2 Million Fraud

Web Summary : Mount Everest guides allegedly poisoned tourists, faking altitude sickness for helicopter rescues and insurance fraud. A $2 million scam involved trekking agencies, hospitals, and fake documents. Investigations are ongoing with arrests.
टॅग्स :NepalनेपाळEverestएव्हरेस्टPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfoodअन्न