शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:50 IST

Rape case : याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे.

दिल्लीतील मालवीय नगर भागात पश्चिम बंगालमधील एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नोकरी लावण्याच्या नावाखाली काही लोकांनी अल्पवयीन मुलाला दिल्लीत आणल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे.ही अल्पवयीन तरुणी मूळची सिलीगुडीची आहे. पीडितेने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले की, तिच्या शेजारच्या वहिनीने तिला तिची मैत्रिण ममताला भेटायला लावले. जिने तिला तीन वर्षांपूर्वी काम मिळवून देण्याचे सांगून दिल्लीत आणले होते. यानंतर ममता तिला घेऊन पंचशील विहार येथील मैत्रिण रीनाच्या घरी गेली आणि काही दिवस ती तिथेच राहिली.ममता आणि रीना यांनी नोकरीच्या नावाखाली पीडितेला विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. इतकेच नाही तर दिल्लीतील अनेक भागात पीडितेसोबत बलात्काराच्या घटना घडल्या आणि पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अल्पवयीन रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. त्याचवेळी याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्ली