शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती; घर उघडून पाहताच दिसले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:07 IST

Dead bodies Found in Home :लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घर उघडून पाहिले असता तेथे आई आणि मुलाचे मृतदेह पडले होते.

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडले आहेत. शाजापूर हौसिंग बोर्ड कॉलनीतील दीनदयाळ नगरमधील घर गेल्या तीन दिवसांपासून बंद होते. तीन दिवसांनंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली, त्यांना काहीतरी अनुचित प्रकार  असल्याचा संशय आला. शेजाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. या प्रकरणाची माहिती मिळताच लालघाटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घर उघडून पाहिले असता तेथे आई आणि मुलाचे मृतदेह पडले होते.मिळालेल्या माहितीनुसार, संतोषबाई यांचे पती ललित सुरा यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी हौसिंग बोर्ड कॉलनीतील दीनदयाळ नगरमध्ये जगदीश गोस्वामी यांचे घर विकत घेतले होते. संतोष बाई (70) या घरात अर्धांगवायू झालेला मुलगा धर्मेंद्र (50) याच्यासोबत राहत होत्या. हे घर गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती रहिवाशांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खिडकीतून डोकावले असता महिलेचा मृतदेह तेथे पडलेला होता. यावर पोलिसांनी दरवाजा तोडला.

मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्नपोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. त्यांनी घराची झडती घेतली असता मुलाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. चौकशीत दूधवाल्याने पोलिसांना सांगितले की, तो तीन दिवसांपासून दररोज दूध देण्यासाठी येतो, मात्र कोणीही दरवाजा उघडत नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता या घरात आई आणि मुलगा राहत असल्याचे समोर आले. आई वृद्ध होती आणि मुलाला अर्धांगवायू झाला होता.

थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्यालालघाटी पोलिस स्टेशनचे प्रभारी केके चौबे म्हणाले की, घरात हत्येबाबत कोणतेही पुरावे सापडले नाहीत किंवा जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रथमदर्शनी दोन्ही मृत्यू अपमृत्यु वाटतात. मुलगा बाथरूममध्ये गेला असावा आणि तेथे पडल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या धक्क्यात महिलेचाही बेडवरच मृत्यू झाला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस