शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उत्तर-दक्षिणेतील दाेन्ही आराेपींचे नाव गंगाधरच, महाराष्ट्रातील भानगड काेणत्या गंगाधरची?

By राजकुमार जोंधळे | Updated: July 11, 2024 22:32 IST

गंगाधार जाळ्यात अडकला तरी तपास यंत्रणांसमाेर दाेन ‘गंगाधर’ने निर्माण केला संभ्रम

राजकुमार जाेंधळे, लातूर: ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याच्या आराेपाखाली गंगाधरला सीबीआयने अटक केली. गंगाधार जाळ्यात अडकला तरी तपास यंत्रणासमाेर दाेन्ही ‘गंगाधर’ने संभ्रम निर्माण केला आहे. नीट प्रकरणात सीबीआयने उत्तर अन् दक्षिण भारतातून गंगाधार नावाच्या दाेघांना अटक केली. महाराष्ट्रातील भानगड काेणत्या गंगाधरने केली आहे, याचा शाेध तपास यंत्रणा घेत आहे. लातूर आराेपींचा नेमका काेणा गंगाधरसाेबत संबंध आला, याची पडताळणी केली जात आहे.

नांदेड एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रारंभी लातुरातील तिघा संशयीतांची चाैकशी केली हाेती. दरम्यान, एका दिवसाच्या चाैकशीनंतर ‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचे समाेर आले. यातूनच लातुरात चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला. यामध्ये लातुरातील तिघे अन् दिल्लीतील गंगाधर नावाच्या आराेपीचा समावेश आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान स्थानिक पाेलिस यंत्रणेसमाेर हाेते.

उत्तराखंडमधून घेतले ताब्यात

चाैघांपैकी दाेघा शिक्षकांना पाेलिसांनी तातडीने अटक केली. मध्यस्थ म्हणून चाैकशीतून समाेर आलेला इरण्णा काेनगलवार अद्यापी गुंगारा देत पसार आहे. दिल्लीतील गंगाधरच्या शाेधात लातूर पाेलिसांची पथके रवाना झाली हाेती. आठ-दहा दिवस उत्तर भारतात शाेध घेतल्यानंतरही ताे हाती लागला नाही. अखेर त्याला उत्तराखंडमधून सीबीआयने दाेन आठवड्यापूर्वीच ताब्यात घेतल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. ताे मुळचा महाराष्ट्रातील असून, त्याचीही चाैकशी केली जात आहे.

सीबीआयचा हिसका अन् गंगाधारचा सुगावा

चार दिवसांपूर्वी सीबीआयने एन.गंगाधर अप्पा नावाच्या व्यक्तीला आंध्र प्रदेशातून अटक केली. ताे बंगळरु येथील सीबीआय काेठडीत हाेता. लातुरातील गुन्ह्यात सीबीआय पथकाने त्याला साेमवारी रात्री लातुरात आणले. आराेपींनी पाेलिसांना जबाबात सांगितलेला गंगाधर हा दिल्ली येथील असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर सीबीआयने चाैकशीदरम्यान आराेपींना चांगलाच हिसका दाखविला अन् माेबाईलमध्ये सेव्ह असलेल्या गंगाधारचे लाेकेशन आंध्र प्रदेशात निघाले. या दाेन्ही गंगाधारची चाैकशी केली जात असून, नीट प्रकरणाचा तपास केला जात आहे.

गंगाधरचा वावर किती राज्यामध्ये?

दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील गंगाधारचा नेमका किती राज्यात वावर आहे, याची कसून चाैकशी तपास यंत्रणांकडून केली जात आहे. चाैकशीसाठी आंध्र प्रदेशातून लातुरात आणलेल्या गंगाधरची दाेन दिवसांपासून सीबीआयकडून झडती घेण्यात आली. त्याच्या कारमान्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याने ताेंड उघडले असून, एजंटांची नावेही सांगितल्याचे समाेर आले आहे.

पालक-विद्यार्थ्यांचे जबाब; चौकशीच्या फेऱ्यात अडकले...

दाहा दिवसांपासून लातुरात मुक्कामी असलेल्या सीबीआय पथकाने आराेपींच्या चाैकशीत, त्यांच्या माेबाईलमध्ये आढळून आलेल्या यादीतील पालक-विद्यार्थ्यांची चाैकशी सुरु केली आहे. जबाब नाेंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लातूर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील पालकांचा यामध्ये समावेश असून, हे पालक सध्याला सीबीआय चाैकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आतापर्यंत ३२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळल्याचे समाेर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर