उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. वाराणसी येथील एका २१ वर्षीय तरुणीने एका कॅब ड्रायव्हरविरोधात बलात्कार आणि फसवणूक केल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वैद्यकीय अहवाल, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी लखनऊच्या गोमती नगरमधील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होती. चिन्हाट परिसरात ती भाड्याने खोली घेऊन राहत होती. जुलै २०२३ मध्ये तिची ओळख आदित्य यादव नावाच्या कॅब ड्रायव्हरशी झाली. कोचिंगला येण्या-जाण्याच्या प्रवासात त्यांच्यात संवाद वाढला आणि आदित्यने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा आरोप आहे की, आदित्यने तिला एके दिवशी बहाण्याने आपल्या खोलीवर नेले. तिथे तिला गुंगीचे औषध टाकलेला चहा पाजला आणि ती बेशुद्ध असताना तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तिला शुद्ध आली आणि तिने जाब विचारला, तेव्हा त्याने लग्नाचे आश्वासन देऊन वाद मिटवला.
काही दिवसांनंतर पीडिता गर्भवती असल्याचे समजताच, आदित्यने दोन मित्रांच्या उपस्थितीत खोटे लग्न केले. परंतु आदित्यने पीडितेला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवले. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडितेने एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर आदित्य तिला नौबस्ता येथील एका भाड्याच्या खोलीत सोडून औषध आणण्याच्या बहाण्याने पसार झाला, तो पुन्हा परतलाच नाही. पीडितेने जेव्हा आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला धमकावले. 'तू माझी पत्नी नाहीस, जा आणि तुझ्या मुलीसोबत मर', असे क्रूर शब्द त्याने उच्चारल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. सध्या पीडित तरुणी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडली आहे.
याप्रकरणी पीडितेने १८ फेब्रुवारी रोजी एसीपी विभूती खांड आणि जॉइंट सीपी बबलू कुमार यांची भेट घेऊन तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. चिन्हाट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : A Lucknow woman was drugged, raped, and falsely married by a cab driver. He abandoned her after she gave birth. Police are investigating the crime and searching for the accused.
Web Summary : लखनऊ में एक महिला को कैब ड्राइवर ने नशीली दवा देकर बलात्कार किया और झूठी शादी से धोखा दिया। बच्चे को जन्म देने के बाद उसने उसे छोड़ दिया। पुलिस मामले की जांच कर रही है।