शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

NCB ची मुंबईसह ठाण्यात छापेमारी; तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 19:09 IST

NCB Raid : अटक केलेल्या लोकांच्या ताब्यातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. 

ठळक मुद्देया कारवाईत एनसीबीने ३ जणांना विविध ठिकाणी अटक करून एकूण २२० ग्रॅम एमडी व ४३ किलो गांजा आणि २० लाख ५ हजार रुपये जप्त करण्यात आले.

मुंबईतील विविध ठिकाणी छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी तीन जणांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून ड्रग्ज जप्त केली. आग्रीपाडा, नागपाडा आणि बदलापूर येथे छापा टाकण्यात आला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या लोकांच्या ताब्यातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. 

राज्यात अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी एनसीबीने गेल्या काही आठवड्यांत कठोरपणे अशाप्रकारे छापेमारी सुरु ठेवली आहे. १५l एप्रिलला एनसीबीने महाराष्ट्रातील डोंबिवलीतील हायड्रोपोनिक उत्पादनाच्या दुकानातून दोन ड्रग पेडलर्सना अटक केली होती. एनसीबी मुंबईने मुंबईत ड्रग सप्लायर्स आणि पेडलर्सविरोधात सातत्याने कारवाई सुरु ठेवली आहे. एनसीबी मुंबईत २ ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एनसीबीने ३ जणांना विविध ठिकाणी अटक करून एकूण २२० ग्रॅम एमडी व ४३ किलो गांजा आणि २० लाख ५ हजार रुपये जप्त करण्यात आले.

गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी मुंबईने १६५ ग्रॅम एमडी ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या झडती दरम्यान ड्रग्सची कारवाई करताच 2,15,000 / - रुपयेही जप्त केले. सरफराज @ पप्पीवर यापूर्वी एएनसी मुंबईने एनडीपीएस प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी चौकशीदरम्यान त्याने खुलासा केला की, नागपाडा येथील समीर सुलेमान शमा याने एमडी पुरविला होता. एनसीबीच्या पथकाने माहितीवरुन कारवाई केली आणि समीरच्या घराची झडती घेतली आणि १७ ग्रॅम एमडी व ९० हजार रुपये जप्त केल्याचे समजते. समीर सुलेमान घरात हजर नव्हता, मात्र एनसीबी मुंबई त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील तपास सुरू आहे.तर बदलापूर येथे एका घरातून ४३ किलो गांजा ताब्यात घेतला आणि सनी परदेशी आणि अजय नायर या संशयितांना पकडले. कुणाल कडू या व्यक्तीकडून गांजाची माल खरेदी केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. हा गांजा ओडिशा राज्यातून खरेदी करण्यात आला होता. ओडिशाचा मुख्य सूत्रधार आणि पुरवठादार शोधण्यासाठी एनसीबी तपास करत आहे. 

 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोraidधाडArrestअटकMumbaiमुंबईbadlapurबदलापूरPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ