NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 02:46 PM2021-10-09T14:46:33+5:302021-10-09T14:47:07+5:30

Cruise Drugs Case : अरबाजने कबूल केले की, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि क्रूझवर धमाल करण्याच्या मार्गावर होते.

NCB Panchnama: Aryan Khan had taken charas; Arbaaz Merchant removes the packet from the shoe | NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट

NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट

Next
ठळक मुद्देमुंबईच्या खोल समुद्रात २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत.

मुंबई ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची रवानगी सध्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानने ड्रग्स घेतलं होतं की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट हा ६ ग्रॅम चरस आपल्या बुटात लपवून क्रुझवर घेऊन जात होता असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. 

मुंबईच्या खोल समुद्रात २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारणा केली असता, अरबाज मर्चंटने स्वतः त्याच्या शूजमधून चरस असलेले झिप लॉक पाउच काढले. अरबाजने कबूल केले की, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि क्रूझवर धमाल करण्याच्या मार्गावर होते. जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्याने कबूल केले की, तो चरस घेतो आणि हे चरस क्रूझ ट्रिपमध्ये ओढण्यासाठी घेतले होते.  क्रुझ ड्रग्स प्रकरणातील छापेमारीवेळी एनसीबीने केलेल्या पंचनाम्यात हे नमूद करण्यात आलं आहे.

पंचनामा म्हणजे काय?

 पंचनामा ही एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे तपास यंत्रणा गुन्हेगारीच्या ठिकाणाहून प्राथमिक नोंदी आणि पुरावे गोळा करते. या दरम्यान, पोलीस किंवा तपास यंत्रणा साक्षीदारांचे जबाब नोंदवतात. पंचनामा तयार करताना पोलीस काही नागरिकांना घेतात जेणेकरून ते तपास यंत्रणेच्या कारवाईचे प्रत्यक्षदर्शी बनू शकतील.

एनसीबीच्या पंचनाम्यात दोन पंचाचा उल्लेख आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर रोघोजी सेन. या पंचनामाच्या पान क्रमांक ६ मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा उल्लेख आहे.
पंचनाम्यानुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंटने पहिल्यांदा एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना विचारल्यावर त्यांची नावे दिली. मग एनसीबीच्या अधिकाऱ्यानेही त्याला चौकशीचे कारण सांगितले.

यानंतर आशिष रंजन प्रसाद यांनी दोन्ही तरुणांना एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 50 मधील तरतुदी समजावून सांगितल्या. एनसीबीने आर्यन आणि अरबाजला पर्याय देखील दिला की, जर त्यांची झडती  राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांसमोर करायचा असेल तर ते होऊ शकते, परंतु दोघांनीही विनंती नाकारली. यानंतर झडतीची प्रक्रिया सुरू झाली. पंचनाम्यानुसार, तपास अधिकाऱ्याने दोघांना विचारले की, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना दोघांनी त्यांच्यासोबत बंदी घातलेले ड्रग्ज असल्याचे कबुल केले 

एनसीबीच्या पंचनाम्यात म्हटले आहे की, अरबाज मर्चंटने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, त्याच्या शूजमध्ये चरस आहे. यानंतर अरबाजने स्वेच्छेने त्याच्या शूजमध्ये ठेवलेले झिप लॉक पाउच काढले. या झिप लॉकच्या आत एक काळा चिकट पदार्थ होता. जेव्हा डीडी किटसह त्याची चाचणी घेण्यात आली, तेव्हा हे पदार्थ चरस असल्याचे निश्चित झाले.

पंचनाम्यानुसार, अरबाजने कबूल केले की, तो आर्यन शाहरुख खानसोबत चरस घेतो आणि ते या क्रूझ ट्रिपमध्ये मज्जामस्ती करणार होते. पंचनाम्यात लिहिले आहे की, यानंतर, जेव्हा आर्यन खानला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने कबूल केले की, तो चरस देखील ओढतो आणि हे चरस क्रूझवर प्रवास करताना ओढण्यासाठी वापरणार होते. या चरसचे वजन 6 ग्रॅम होते.

Read in English

Web Title: NCB Panchnama: Aryan Khan had taken charas; Arbaaz Merchant removes the packet from the shoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app