शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

शेअर बाजाराच्या देण्यांतून नौसैनिकाला जाळल्याचे उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 4:43 AM

पोलीस तपासांत अनेक बाबी स्पष्ट; पोलीस अधीक्षकांची माहिती

पालघर : तलासरी वेवजी गावाच्या जंगलात सूरजकुमार दुबे या रांची येथील २७ वर्षीय नौदल सैनिकाचे अपहरण करून खून केल्याचे प्रकरण गाजले होते. हा खून शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी तपासासाठी १०० पोलिसांची १० पथके बनविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.झारखंड राज्यातील रांची येथील डाल्टनगंज येथील रहिवासी असलेले सूरजकुमार दुबे हे भारतीय नौदलात २००१ पासून रुजू झाले होते. ३१ जानेवारी रोजी त्यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करून तीन दिवस चेन्नईत एका अज्ञात ठिकाणी कोंडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळील वेवजी गावाच्या जंगलात झाडाला बांधून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांना मृत्यूने गाठले होते. या प्रकरणात अपहरणासह खुनाचा प्रयत्न या कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी कलम ३२० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपासाअंती समोर आलेले काही वेगळे मुद्दे पत्रकारांसमोर मांडले. सूरजकुमार यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबानीत १० लाख रुपयांसाठी आपले अपहरण करून जाळल्याची माहिती दिली होती. सूरज यांच्याजवळ दोन मोबाईल नंबर असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे असले तरी त्यांच्याजवळ एकूण तीन मोबाईल नंबर असल्याची माहिती समोर आली आहे.मित्रांकडून घेतले होते कर्ज घरी माहीत नसलेल्या अन्य दुसऱ्या मोबाईल नंबरवरून सूरज याने शेअर मार्केटशी व्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. त्याला शेअर आणि स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेड होते. त्याच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. या शेअर मार्केटच्या वेडापायी त्याने लाखो रुपयांचे कर्ज बँकेकडून, मित्रांकडून, अन्य लोकांकडून घेतल्याची बाबही समोर आली आहे.