शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी बुडणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 7:22 PM

मुंबई - मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने त्याचे प्राण वाचवल्याची घटना रविवारी रात्री घडली. बुडणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा तरुण अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हचा किनारा ...

मुंबई - मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने त्याचे प्राण वाचवल्याची घटना रविवारी रात्री घडली. बुडणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा तरुण अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मुंबईच्या मरीन ड्राईव्हचा किनारा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी येत असतात. या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस आणि नौदलाचे अधिकारी कायम त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी रात्री नौदलाचे अधिकारी आकाश, धनंजय आणि विश्वकर्मा हे नेहमीप्रमाणे गस्तीसाठी मरीन ड्राईव्हच्या समुद्रात गस्तीसाठी आले होते. त्यावेळी समुद्र किनाऱ्यापासून १५० मीटर आत समुद्रात कुणीतरी बुडत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती त्यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देत मदत मागवली. नौदलाच्या बोटीने त्या बुडत्या तरुणाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, खवळलेल्या समुद्रात बोट तग धरत नव्हती. त्यावेळी धनंजय या अधिकाऱ्याने समुद्रात उडी टाकत, बुडत असलेल्या तरुणाच्या दिशेने पोहत गेले. धनंजय आणि त्याच्यासोबत असलेल्या आकाश आणि विश्वकर्मा या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शर्तीने त्या तरुणाला बाहेर काढले. तोपर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बुडणाऱ्या तरुणाला वैद्यकिय उपचारांची मदत हवी असल्याचे लक्षात येताच त्याला पोलिसांच्या मदतीने शासकिय रुग्णालयात उपचापासाठी नेले. बुडणारा तरुण अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या तरुणांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नौदलाचे अधिकाऱी आणि पोलिसांनी केलेल्या या विशेष कामगिरीचे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून  कौतुक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे