शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'जैश ए मोहम्मद' संघटनेवर NIA ची नजर; देशात ८ राज्यासह महाराष्ट्रातही ३ ठिकाणांवर धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:39 IST

अमरावतीत धाड सुरू होती त्याचवेळी भिवंडीत NIA च्या दुसऱ्या पथकाने खादीपार परिसरातील कामरान अंसारी याच्या घरावर धाड टाकली

मुंबई - नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA)च्या पथकानं जैश ए मोहम्मद दहशतवाद षडयंत्र प्रकरणी १२ डिसेंबरला देशातील ८ राज्यातील १९ ठिकाणांवर धाड टाकली. आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात याठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी अनेक संशयास्पद कागदपत्रे, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, सीडी, हार्ड डिस्कसह अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. 

जैश ए मोहम्मदचा संशयित दहशतवादी शेख सुल्तान सलाह उद्दीन उर्फ अयूबी याच्या निकटवर्तीयांवर ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. अयूबीला याआधीच अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेशी निगडित प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप आहे. युवकांना संघटित करून कट्टरपंथी बनवणे आणि दहशतवादी संघटनेत भरती करणे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एका मौलवीचा सहभाग होता. त्याची चौकशी करण्यात आली आहे. 

अमरावतीतील २६ वर्षीय युवकासोबत भिवंडीतही एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमरावतीत मोहम्मद मुसीब शेखच्या घरावर NIA अधिकाऱ्यांनी सकाळी ३.३० च्या सुमारास छापा टाकला. एनआयए टीम घरी पोहचताच अर्धा तास घरचा दरवाजा उघडला नव्हता. त्यानंतर मोहम्मद  मुसीबला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुसीबच्या घरी छापेमारी केल्यावर पुस्तके, डायऱ्या सापडल्या त्यात काही पाकिस्तानी नंबरही आढळले. ज्या डायरीत पाकिस्तानी नंबर आहेत ते नातेवाईकाचे आहेत असं घरच्यांनी दावा केला. मागील काही महिन्यापासून माझा मुलगा परफ्यूमचा व्यवसाय करतो, तर मुसीबचे वडील रिक्षा चालवतात असं त्याच्या आईने सांगितले.

अमरावतीत धाड सुरू होती त्याचवेळी भिवंडीत NIA च्या दुसऱ्या पथकाने खादीपार परिसरातील कामरान अंसारी याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरचा शोध घेतला असता लॅपटॉप आणि काही कागदपत्रे जप्त केली. अंसारी मालेगावचा रहिवासी आहे. तो खूप धार्मिक आहे. व्यवसायाने तो इंजिनिअर आहे असं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. अंसारीलाही एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आसामच्या गोलपारा, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, उत्तर प्रदेशातील झांशी, बरेली, देवबंद, सहारनपूर, बिहारमधील सीतामढी, पश्चिम बंगालमधील हुगली, जम्मू काश्मीरमधील बारामूला, रियासी, बडगाम, अनंतनाग, राजस्थानमधील डुंगरपूर आणि गुजरातमधील मेहसाणा येथे NIA च्या पथकाने छापेमारी केली आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तान