शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नारदा स्टिंग ऑपरेशन : सीबीआयने केली पहिली अटक; आयपीएस अधिकाऱ्याला केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:48 IST

या स्टिंग ऑपरेशनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनमध्ये एका कथित उद्योजकाला फायदा मिळवण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आयपीएस अधिकारी पैसे घेताना दाखवण्यात आलं होतं. विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी सीबीआयने आयपीएस अधिकारी सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा यांना अटक केली आहे. आता सीबीआयने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं तेव्हा हुसेन मिर्झा त्यावेळी वर्द्धमान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी करण्यात आलेली ही पहिली अटक आहे. या प्रकरणात काही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचीही नावे आहेत. स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना ते कैद झाले होते. २०१६ मध्ये पश्चिम बंगाल निवडणुकीआधी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका कथित उद्योजकाला फायदा मिळवण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आयपीएस अधिकारी पैसे घेताना दाखवण्यात आलं होतं. या स्टिंग ऑपरेशनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.सीबीआयने नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात पहिली अटक करत आयपीएस अधिकाऱ्याला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्य असूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणी करून मिर्जा यांना विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. नारदा समाचार पोर्टल आणि मॅथ्यू सॅम्युअलने जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळी मिर्जा पश्चिम बंगालमधील वर्द्धमान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. यापूर्वी देखील मिर्जा यांची चौकशी करण्यात आली होती. 

टॅग्स :ArrestअटकCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगाल