शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 8:42 PM

अशोक कामटे, रॉय यांच्या मालमत्तेची माहिती मागविणार नाही;  नजर चुकीतून प्रकार घडल्याची महासंचालकांची कबुली

ठळक मुद्दे‘लोकमत’ने हा गृह विभाग व पोलीस मुख्यालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. दिवगंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.

जमीर काझीमुंबई - २६/११ मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा आयपीएस अशोक कामटे यांच्यासह दिवंगत अधिकारी हिमांशू रॉय, आर.के. सहाय आदींकडून मालमत्तेबाबत माहिती मागविण्याबाबतचा प्रकार घडल्याची कबुली राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिली आहे. संबंधित प्रकार नजर चुकीने घडला असून त्यांची नावे तातडीने हटविण्यात आली असून संबंधितांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा कसलाही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ज्या आयपीएस अधिकाऱ्यांनी २०१८ या वर्षात त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेबाबत माहिती कळविली नव्हती, त्यांना त्याबाबत तातडीने  माहिती कळविण्याची सूचना केंद्रीय गृह विभागाकडून करण्यात आलेली होती. त्या यादीमध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद व अन्य मृत अधिकाऱ्यांचा समावेश होता. ‘लोकमत’ने हा गृह विभाग व पोलीस मुख्यालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. त्याबाबत पोलीस वर्तुळासह सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महासंचालक कार्यालयाने संबंधित यादीच संकेतस्थळावरुन तातडीने हटविली. त्याचप्रमाणे दिवगंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.

शहीद अधिकाऱ्याकडे मागितला मालमत्तेचा तपशील; गृह खात्याचा भोंगळ कारभार

पोलीस महासंचालक जायसवाल म्हणाले की,‘ शहीद अशोक कामटे व दिवंगत अधिकाऱ्यांबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आहे. त्यांच्या कुटुंबियांना दुखाविण्याचा कसलाही हेतू नाही. नजर चुकीतून त्यांची नावे आलेली आहेत. तातडीने ती  हटविण्यात आली असून ही यादी अद्यावत करुन त्याबाबत केंद्रीय गृह विभागाकडे माहिती पाठविली जाईल.

 केंद्राने पाठविलेल्या १४ जणांच्या यादीमध्ये  शहीद अशोक कामटे , दिवंगत सर्वश्री आर.के.सहाय, हिमांशू रॉय,आनंद मंड्या,  स्वेच्छा निवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, बडतर्फ मारिया फर्नांडिस, निवृत्त अप्पर महासंचालक भगवंत  मोरे यांचा समावेश होता. गृह विभागाने या यादीची शहानिशा न करता कार्यवाहीसाठी ती पोलीस मुख्यालयाकडे पाठविली. संबंधित अधिकाऱ्यांनी ती व्यवस्थित न पाहता संबंधितांना स्थावर मालमत्तेबाबतची माहिती पाठविण्याबाबत कळविले होती. त्याचप्रमाणे ही यादी पोलीस दलाच्या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आली होती. 

शहीद व मृत अधिकाऱ्यांची नावे नजरुचुकीने राहिली होती. त्यामध्ये कुटुंबियांना दुखाविण्याचा  कसलाही हेतू नाही. ही यादी तातडीने   हटविण्यात आली असून  अद्यावत  सुधारीत माहिती  केंद्राकडे पाठविली जाईल. - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य)  

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिसMumbaiमुंबई