शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

लॉकडाऊन नावालाच, बारमध्ये झिंगाट; मयखाने तळीरामांनी ओव्हरफ्लो, रात्री अकरानंतरही सर्रास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 08:53 IST

मीरा- भाईंदरमध्ये सुमारे १५० च्या घरात बार आहेत. त्यातही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने असलेले ३२ बार आहेत. याशिवाय १६ वाईन शॉप व ३५ बिअर शॉप आहेत. वाईन शॉप आणि बिअर शॉपच्या ३० मीटर परिघात मद्यपान करण्यास मनाई असते. येथे मात्र अनेक बिअर व वाईन शॉपच्या आवारात सर्रास मद्यपान सुरू असते.

धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये बारचालकांनी कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी सरकार व महापालिकेने जारी केलेली नियमावली सपशेल धुडकावून लावली आहे. वेळेचे बंधनही या बहुतांश बारवाल्यांनी झुगारून दिले आहे. मुळात या बारवाल्यांना नियमांचे पालन करण्याची सवयच नसल्याने अशा बार व त्यांच्या मालकांवर थातूरमातूर नव्हे, तर परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पण सर्वच संबंधित यंत्रणांचे हात ओले केले जात असल्याने उल्लंघनाकडे कानाडोळा करण्याचे कर्तव्य या यंत्रणा व्यवस्थित बजावत असल्याचे दिसून येत आहे. यंत्रणाच झिंगाट झाल्यावर कोण कोणाला बोलणार? हा खरा प्रश्न आहे.मीरा- भाईंदरमध्ये सुमारे १५० च्या घरात बार आहेत. त्यातही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने असलेले ३२ बार आहेत. याशिवाय १६ वाईन शॉप व ३५ बिअर शॉप आहेत. वाईन शॉप आणि बिअर शॉपच्या ३० मीटर परिघात मद्यपान करण्यास मनाई असते. येथे मात्र अनेक बिअर व वाईन शॉपच्या आवारात सर्रास मद्यपान सुरू असते. काही बिअर शॉपवाल्यांनी तर दुकानाच्या बाहेरच पार्टीशन टाकून दारू पिण्याची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. काही वाईन शॉप, बिअर शॉपवालेच अगदी चकण्याची पाकिटेही विकत असतात. बिअर शॉपवाले तर फ्रीजचा चार्ज सांगून छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारतात. शहरातील एकाही बारमध्ये आता सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आसन व्यवस्थेचा सर्रास वापर केला जात आहे. 

सरकारी महसूल बुडीतकाही बार व ऑर्केस्ट्रा बारचालक परवान्यांचे नाव वेगळे आणि पाटी दुसऱ्याच नावाची लावतात. अनेक बारवाले तर परवाना भरताना दाखवलेल्या आसनव्यवस्थेपेक्षा जास्त संख्येने आसने ठेवून सरकारचा महसूल चोरी करतात.

नागरिकांना त्रासमीरा-भाईंदर शहरात जी परिस्थिती आहे, त्यापेक्षा वेगळे काही चित्र शहराबाहेरील दुकानात दिसत नाही. तेथेही रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन सुरूच असते. त्या गोंधळाचा नागरिकांना त्रास होतो; पण सांगणार कोणाला, हा खरा प्रश्न आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?कोरोनाच्या संसर्गामुळे बारचालकांना ५० टक्केच आसनव्यवस्था वापरण्याची परवानगी दिलेली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांनी मास्क- हातमोजे वापरणे सक्तीचे आहे. सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. काटेकोर स्वच्छता व येणाऱ्या ग्राहकांची तसेच कर्मचाऱ्यांची कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेणे बंधनकारक आहे. पण यातील कशाचेही पालन होताना दिसत नाही

वेळेचे उल्लंघनबारसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे काटेकोर पालन केलेले नसते. अग्निशामक यंत्रणांचे उल्लंघन असते. बारसाठी दिलेल्या वेळेचे अनेकजण नियमित उल्लंघन करत असतात. त्याकडेही दुर्लक्ष हाेत आहे. 

नियंत्रण यंत्रणा नावालामुर्धा, राई, डोंगरी, उत्तन, पाली, काजूपाडा, चेणा या परिसरातील बार, वाईन शॉप सर्रास रात्री एकपर्यंत सुरू असतात. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे; पण ती केवळ नावालाच आहे, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

सुरक्षिततेकडे डाेळेझाकबारचे बहुतांश कर्मचारी हे मास्क व हातमोजे याचा वापरच करत नाहीत. सॅनिटायझेशन केले जात नाही. बार सुरू ठेवण्याची वेळ रात्री ११ पर्यंतची असताना, सर्रास रात्री साडेबारा ते एकपर्यंत सुरू असतात. यासाठी बारचालक यंत्रणांचे हात व्यवस्थित ओले केले जात असल्याने तेही नियमकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेliquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी