शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नग्नावस्थेत गाडी चालवणाऱ्या विकृत चालकाला पोलिस कोठडी , संपुर्ण शरीर आणि वस्तुंवर लावलं होतं बॉडी लोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 18:03 IST

या विकृत वाहन चालकाचे नाव अनेक गुन्ह्यांमध्ये रोवल्याची माहिती तपासाअंती पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्देभरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे एका चालकाला ओक्लाहोमा पोलिसांनी अटक केलीत्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर अनेक पॉर्न मॅगझीन्सही सापडले.त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत आणि त्याने त्यासाठी पोलिस कोठडीसुध्दा अनुभवली आहे.

युएस - भरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे एका चालकाला ओक्लाहोमा पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि विचित्र गोष्टी पोलिसांसमोर आल्या.

हा चालक विवस्त्र अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले असून त्याने केवळ अंतर्वस्त्र परिधान केली होती. एवढंच नाही तर त्याने शरीरातील काही भागावर वॅसलिन हे बॉडीलॉशनही लावले होते. तसंच त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर अनेक पॉर्न मॅगझीन्सही सापडले. त्याने असं करण्यामागचं कारण अद्यापही पोलिसांना कळले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

जॉन वेयन केलरमन (54) असे अटक झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली तेव्हा नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्या संपूर्ण शरीराला फक्त वॅसलिनचाच उग्र वास येत होता. एवढंच नाही तर त्याच्या आयडी प्रुफवरही वॅसलिनीचाच वास येत असल्याने पोलीस अधिक संभ्रमात पडले. त्याच्याकडे असलेला वाहनचालकाच्या परवान्याची मुदतही 1985 साली संपली असून तो संपलेल्या लायसन्सचा अजूनही वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जॉनविषयी अधिक तपास केला असता असं समोर आलं की, तो तब्बल 27 वर्षे तो वेगवेगळ्या कारणाने कारागृहात बंद होता. त्याच्यावर ड्रग्सचं व्यसन, चोरी, अत्याचार अशा अनेक गुन्ह्यांचे आरोप होते. या गुन्ह्यांसाठी त्याने 27 वर्षे तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. मात्र तो नग्नावस्थेत कुठे जात होता यामागचं कारण अद्यापही पोलीस शोधत आहेत.

विकृत अवस्थेत गाडी चालवणे, वाहनचालकाचा परवाना नसणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे अशा गुन्ह्यांसाठी त्याच्यावर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्याला 1 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सौजन्य- www.dailymail.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयDrugsअमली पदार्थ