शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ सोन्याचे दागिने दोन तासांत परत, नायगाव पोलिसांना कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 19:14 IST

नायगाव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

नालासोपारा (मंगेश कराळे)- प्रवासादरम्यान लाखो रुपये किंमतीचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने, दोन मोबाईल तक्रारदाराला दोन तासांमध्ये परत करण्यात नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तर हा किंमती मुद्देमाल परत सुखरूप मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांनी नायगावपोलिसांचे आभार मानले आहे. सदर माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

नायगावच्या साईधाम काँप्लेक्समध्ये राहणारे मोहन भगवान चाळके व त्यांची पत्नी नामे मनिषा मोहन चाळके हे दोघे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे स्थानक असे दुचाकीने जात होते. या प्रवासादरम्यान मनिषा चाळके यांची पर्स व त्यातील ५ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ मोबाईल असा मुद्देमाल गहाळ झाले. त्यांनी  नायगाव पोलीस ठाणे येथे मालमत्ता गहाळ झाल्याची तक्रार दिली. सदर गहाळ झालेल्या मालमत्तेमध्ये किंमती मुद्देमाल असल्याने सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेवुन नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती मिळवली. ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, २ तोळे वजनाचे नेकलेस, ५ ग्रॅम वजनाची अंगठी असा २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा एैवज, सॅमसंग  व रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत ३० हजार रुपये असा एकुण ३ लाख ५ हजार रुपये किंमतीचा गहाळ झालेला मुद्देमाल दोन तासांत ताब्यात देण्यात आला आहे.         सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि संतोष सांगवीकर, सपोनि रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे. 

टॅग्स :naigaonनायगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस