शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलीस अटक करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 20:08 IST

HIndustani Bhau : उलट-सुलट मेसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात : अफवांना बळी पडू नका : पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आवाहन

नागपूर : विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करून घेण्याच्या आरोपाखाली नागपूरपोलिसांनी विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मुंबई पोलिसांची चौकशी संपल्यानंतर त्याला आम्ही अटक करून नागपुरात आणणार आहोत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना दिली.

दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षा पद्धती संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज पाठवून विकास फाटक याने मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. त्याच्या या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. आधीच कोरोनाचा धोका असताना जागोजागी गर्दी  जमल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक तीव्र झाला. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी विकास फाटक याला सोमवारी रात्री अटक केली. दरम्यान, ज्या पद्धतीने सोमवारी चिथावणी देऊन आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुन्हा पुढच्या काही तासात असेच उलट-सुलट मेसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात, अशी माहिती पोलिसांकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत नागरिकांनाही आवाहन केले आहे. अफवांना बळी पडू नका, सतर्कता बाळगा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राहील, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची हिंसक घटना कुठे घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 विद्यार्थी-पालकांनो समजून घ्या

 आंदोलनाच्या संबंधाने हिंसक घटना घडल्यास आणि कुण्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. नोकरीसाठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे पासपोर्ट तयार करून घेण्यास अडचण आल्याने विदेशात शिक्षण, नोकरीसाठी जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. 

इंस्टाग्रामवरून जमवाजमव 

सोमवारी नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाची सुरुवात इंस्टाग्रामवरील मेसेजच्या माध्यमातून झाली. एकमेकांना मेसेज देतानाच तो व्हायरल करून बाहेर कुणाला काही सांगायचे, बोलायचे नाही, असे सांगण्यात आले होते. यासाठी वाडीतील काही तरुणांचा पुढाकार होता. त्यांनीच प्रारंभी अडीचशेवर तरुणांची जमवाजमव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटक