शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' तरुणीच्या मृत्युचे गूढ कायम; पोलीस व्हिसेरा अहवालाच्या प्रतीक्षेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:57 IST

पोलीस पुढील तपासासाठी व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

ठळक मुद्देनववर्षाच्या पहिल्याच दिवशी हि दुर्दैवी घटना घडली आहे.नातेवाईकांनी निपाला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल केले.

मुंबई - मुलुंड येथील एका २१ वर्षीय तरुणीचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हि दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपासासाठी व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

मुलुंड येथे राहणारी निपा गाला (२१) ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळा येथे मित्रमैत्रिणींसोबत गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला सकाळी निपा घरी आली. सायंकाळी निपा बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने तिचे वडील नितीन गाला हे घरी आले. त्यांना बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी जायचं असल्याकारणाने नितीन हे बाथरूमजवळ गेले. मात्र, आत त्यांची मुलगी निपा असल्याने ते १० मिनिटं थांबले. नंतर १ तासभर निपा बाथरूममध्ये असल्याचं कळल्यावर नितीन यांनी बाथरूमच्या दरवाज्यावर जाऊन पहिले तर पाण्याचा आवाजही येत नव्हता. शेवटी त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला आणि आत पहिले तर निपा बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. नातेवाईकांनी निपाला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निपाचा मृत्यू हा बाथरूममध्ये गुदमरून झाला असल्याचा तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. मुलुंड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदनाचा अहवाल आला. मात्र, या अवहलातून मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी पुढील तपासाकरिता व्हिसेरा आणि हिस्टो पॅथॉलॉजी अहवालासाठी नमुने पाठविले आहेत. या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस