६०० हून अधिक एडल्ट सिनेमात काम करणाऱ्या पॉर्नस्टारचा रहस्यमय मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 22:01 IST2021-07-16T22:00:34+5:302021-07-16T22:01:06+5:30
आजारपणामुळे स्काई अनेकदा चिंतेत होती. तिला जीवन जगणं कठीण झालं होतं. नेहमी आयुष्याबद्दल ती बोलत बसायची असं एडल्ट फिल्म निर्माते हंस यांनी सांगितले.

६०० हून अधिक एडल्ट सिनेमात काम करणाऱ्या पॉर्नस्टारचा रहस्यमय मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह
कँसरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणारी पॉर्नस्टार डाहलिया स्काईचा गोळी लागून संशयास्पद मृत्यू झाला आहे. ३१ वर्षीय पॉर्नस्टार स्काईचा मृतदेह कारमध्ये आढळला आहे. तिच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खूणा आहेत. डाहलिया स्काई फोर्ड स्टेड ब्रेस्ट कँसरने पीडित होती आणि आजारामुळे ती मानसिक दडपणाखाली जगत होती. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
एडल्ट व्हिडिओ न्यूजनुसार, स्काईने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. तिचा मृतदेह ३० जून रोजी लाँस एंजिल्सच्या सॅन फर्नांडो घाटात आढळला होता. एलएपीडी जासूस डेव पेटेक यांनी सांगितले की, सध्या तपास हा आत्महत्येच्या अँगलने होत आहे. अद्याप असा कोणताही पुरावा सापडला नाही ज्यामुळे तिची हत्या झाला असावी किंवा तिच्यासोबत काही चुकीचं घडलं असावं अशी माहिती त्यांनी स्थानिक माध्यमांना दिली.
आजारपणामुळे स्काई अनेकदा चिंतेत होती. तिला जीवन जगणं कठीण झालं होतं. नेहमी आयुष्याबद्दल ती बोलत बसायची असं एडल्ट फिल्म निर्माते हंस यांनी सांगितले. डाहलिया स्काई ही सुंदर व्यक्ती होती, विनोदी स्वभावाने तिची सगळ्यांसोबत चांगली मैत्री होती. स्काईने तिच्या पॉर्न फिल्मची सुरुवात २०१० मध्ये केली होती. तिचं मूळ नाव बेली ब्ल्यू होतं. ४ वर्षांनी तिने स्वत:चं नाव बदलून डाहलिया स्काई ठेवलं होतं. सोशल मीडियावर अनेकदा तिने तिच्या जीवन संघर्षाबद्दल सांगितले होते. गेल्या एक दशकात तिने ६०० हून अधिक पॉर्न सिनेमात काम केले आहे. तिला फिमेल परफॉर्मर ऑफ द ईयर या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.