दिल्लीतील द्वारका परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका श्रीमंत बापाच्या मुलाने भरधाव SUV कारने २३ वर्षीय साहिल धनशेराचा बळी घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर विनापरवाना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मुलाच्या मृत्यूचा थरार सांगताना आईला रडू कोसळलं. आपला मुलगा १० मिनिटं रस्त्यावर तडफडत होता, पण कोणीही मदतीला धावून आलं नाही, असं त्यांनी रडत सांगितलं.
साहिलची आई इन्ना माकन यांचा आक्रोश सोशल मीडियातून पोलीस विभागापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी जड अंतःकरणाने सांगितलं की, “माझा साहिल रस्त्यावर सुमारे १० मिनिटं तडफडत होता, मदतीसाठी ओरडत होता, पण तिथली गर्दी केवळ प्रेक्षक बनून पाहत राहिली.” इन्ना यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना माहिती मिळाली आणि त्या घटनास्थळी पोहोचल्या, तेव्हा साहिलची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
तपासात समोर आलेली तथ्यं अत्यंत धक्कादायक आहेत. ज्या SUV ने साहिलच्या बाईकला धडक दिली, त्या गाडीची पार्श्वभूमी अत्यंत खराब आहे. या गाडीवर यापूर्वीच १३ वेळा दंड ठोठावण्यात आला होता. यातील बहुतेक दंड उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अतिवेगामुळे (ओव्हरस्पीडिंग) ठोठावण्यात आला होता. यावरून हे स्पष्ट होतं की, गाडीचा मालक आणि चालक नियमांची पायमल्ली करण्यास सरावलेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या अपघाताच्या वेळी गाडी कोणताही अनुभवी ड्रायव्हर नाही, तर एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. ही धडक इतकी जोरात होती की, साहिलला चिरडल्यानंतर ती SUV रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कॅबला जाऊन धडकली, ज्यामध्ये कॅब चालकही गंभीर जखमी झाला.
Web Summary : In Delhi, a speeding SUV driven by a minor killed Sahil Dhaneshra. The mother recounts her son's agonizing 10 minutes on the road, with onlookers failing to assist. The SUV had a history of traffic violations.
Web Summary : दिल्ली में, एक नाबालिग द्वारा चलाई जा रही तेज रफ्तार एसयूवी ने साहिल धनेश्रा की जान ले ली। मां ने बताया कि कैसे सड़क पर उसका बेटा 10 मिनट तक तड़पता रहा, लेकिन किसी ने मदद नहीं की। एसयूवी पर पहले भी कई यातायात उल्लंघन दर्ज थे।